जागतिक आरोग्य दिन

जागतिक आरोग्य दिन


 जागतिक आरोग्य दिन


आज 7 एप्रिल म्हणजे जागतिक आरोग्य दिन. जगातील प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि लोक आरोग्याबाबत जागरूक असावेत याशिवाय जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा विचार व त्यावर उपाययोजना हा या दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. 


भारतामध्ये आयुष मंत्रालया कडून योगा अमृत महोत्सव साजरा करत हा आरोग्य दिन अर्थात World Health Day साजरा केला जाणार. 


पृथ्वीचे आपल्या आरोग्यामध्ये विशेष योगदान आहे मागील दोन वर्ष कोरोना संकटाचा सामना केल्यामुळे  जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या ग्रहाचं आरोग्य आणि त्यावर बेतलेलं आपलं आयुष्य या गंभीर गोष्टीकडे सार्‍यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी, आपली पृथ्वी देखील निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे हे आधोरेखीत करण्यासाठी आपला ग्रह, आपले आरोग्य' अशी संकल्पना ठेवली आहे.


आजच्या या आरोग्य दिनाच्या  लोकांच्या निरामय आरोग्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष  कार्य करण्या-या  आरोग्य विभागातील  आपल्या सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या तसेच आपल्या सर्वांकडून रुग्णांना यापुढेही उत्तम गुणात्मक आरोग्य सेवा देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.


जागतिक आरोग्य दिन कधीपासून व का साजरा करतात ?


जगभरामध्ये 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करत असतो. जागतिक स्तरावर आरोग्याच्या समस्या आणि उपचार त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. 


विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.


Post a Comment

1 Comments