शासकीय कर्मचारी आणि अधिकारी उमेदवारांना पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रियाबाबत सूचना.

शासकीय कर्मचारी आणि अधिकारी उमेदवारांना पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रियाबाबत सूचना.
शासकीय कर्मचारी आणि अधिकारी उमेदवारांना पदस्थापना व नियुक्ती आदेश



  • पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी ठीक साडेनऊ वाजता सुरू होईल. सर्व उमेदवारांनी समुपदेशनाचे ठिकाण स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • जे उमेदवार सकाळी साडेनऊ वाजता हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवारांची समुपदेशन पूर्ण झाल्यावर समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल.
  • समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार पूर्वपरवानगी न घेता अन उपस्थित राहतील त्यांचा नियुक्ती करिता विचार करण्यात येणार नाही.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल याकरिता सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्याची एक एक साक्षांकित प्रत तयार ठेवावी. सदर तपासणी सकाळी दहा पासून सुरू करण्यात येईल.
  • मूळ प्रमाणपत्र नसल्यास किंवा पुरी प्रमाणपत्र असल्यास अशा उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही अशा उमेदवारांना कोणतीही मुदत देण्यात येणार नाही.
  • प्रमाणपत्राची तपासणी पूर्ण झाल्यावरच सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहांमध्ये समुपदेशन व नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजावून घ्यावी व काही शंका असल्यास त्याचे निरसन तिथेच करून घ्यावे.
  • निवडीसाठी पात्र उमेदवारांची संवर्गनिहाय अंतर्गत जेष्ठता सूची नुसार समुपदेशनासाठी बोलविण्यात येईल.
  • समुपदेशन जाण्यापूर्वी उमेदवाराने सभागृहात व सूचना फलकावर त्याच्या संवर्गातील रिक्त पदाची माहिती काळजीपूर्वक पाहावी व शिल्लक पदा मधून त्यांच्या पसंतीची दोन ते तीन ठिकाणी निवडावीत.
  • समुपदेशन समितीकडे परिशिष्ट अ मधील समुपदेशन नमुना सादर करावा व उमेदवाराने निवडलेला दोन ते तीन ठिकाणा मधून एका ठिकाण अंतिम करावे.
  • उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यामध्ये करण्यात येईल त्यानुसार रिक्त पदामध्ये बदल होत राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्यानुसार पसंतीक्रम मध्ये सुधारणा करावी.
  • उमेदवाराने पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील यानंतर उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणांमध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही.
  • उमेदवाराने व समुपदेशन समितीने पदस्थापना चे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराचे नियुक्तीचे आदेश तयार करण्यात येतील.
  • उमेदवार सदर नियुक्तीचे आदेश तपासून त्यात नमूद आपले नाव प्रवर्ग पदाचे नाव पदस्थापना चे ठिकाण इत्यादी तपशील बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी व नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोच पावती द्यावी.
  • उमेदवार नियुक्ती प्रक्रिया बाबत काही आक्षेप असल्यास त्याची तात्काळ समुपदेशन समिती सूचित करावे सदर उमेदवारांनी समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्विकारला जाणार नाही.

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Post a Comment

0 Comments