जिल्हा न्यायालय यवतमाळ आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता 9 पदे भरण्यासाठी जाहिरात

जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे सफाईकामगार या पदाकरिता नऊ पदासाठी भरती होणार आहे 

जिल्हा न्यायालय यवतमाळ आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता 9 पदे भरण्यासाठी जाहिरात 

Advertisement to fill 9 posts for the post of Sweeper in District Court Yavatmal Establishment.

जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवरील "सफाईगार" या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा न्यायालय यवतमाळ सफाई कामगार



उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर.पी.ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) पोचपावतीसह "सफाईगार पदाकरीता अर्ज" असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक, जिल्हा न्यायालय यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे "जिल्हा न्यायालय" असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.

या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर "सफाईगार पदाकरीता अर्ज" असे नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाव्दारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.

सफाईगार निवड यादीसाठी सफाईगार पदाची संख्या ०९

Download Full advertisement 

अर्हता


* प्रकृतीने सुदृढ असावा.

वयोमर्यादा


* या जाहिरातीच्या दिवशी उमदेवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावाव मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

कामाचे स्वरुप


निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात "सफाईगार" या पदावर नियुक्ती दिली जाईल. उमेदवारास नियुक्तीनंतर न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहाची, इमारतीची व परिसराची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील. तसेच अशा उमेदवारांना न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. सफाईगार हे पद एकाकी असून, पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असतील असे नाही. याबाबतीत नोंद घ्यावी.

वेतनश्रेणी


७ व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ या सुधारित वेतन सरंचनेत रुपये १५,०००/- व नियमानुसार देय भत्ते.

उमेदवारांना सुचना


१. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या-त्या विभाग / कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवुनच अर्ज करावा. अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपआपल्या विभाग / कार्यालय प्रमुखा मार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.

२. उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायीक विभागाच्या अधिका-यांना / कर्मचा-यांस भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल. या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहील.

३. अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालय, यवतमाळचे संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/yavatmal यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.

४. उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत.

५. उमेदवाराने त्यांचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशाप्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल..

६. उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्यांचे विरुध्द कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली / चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे. असल्यास त्याचा तपशिल द्यावा.

७. विहीत नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

८. निवड समिती योग्य ते निकष लावुन अर्हता / योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसुची जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलक व
https://districts.ecourts.gov.in/yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल. ९. अशी अल्पसुची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकारी निवड समितीकडे राखुन ठेवलेले आहेत.

१०. सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.

११. सफाईगार पदासाठी चाफल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.

१२. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्व:खर्चाने हजर राहावे लागेल.

१३. सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास किंवा अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

१४. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहील.

सेवाप्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.


१. दिनांक १२/०६/ २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्याची अंतीम वेळ राहील.

२. दिनांक १३/०६/२०२३ ते २८/०६/२०२३ या कालावधीत सफाईगार पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्जाची छाननी पुर्ण झाल्यानंतर निवड समिती योग्य ते निकष लावुन अहर्ता / योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसुची तयार करेल व अशी अल्पसूची जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलकावर व https://districts.ecourts.gov.in/vavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

३. अल्पसुची मध्ये नांव असलेल्या उमदेवारांनी शैक्षणीक कागदपत्राच्या सत्यप्रती, फोटो ओळखपत्र (जसे आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवान्याची प्रत इत्यादी), दोन सन्माननीय व्यक्तींनी उमदेवारांचे चारित्र्य चांगले असलेबाबत दिलेले मुळ दाखले, शासन विहीत करेल त्या प्राधिका-यांने दिलेल्या जातीचा दाखला (जेथे लागु असेल तेथे), कुटूंब लहान असल्याबाबतचे मुळ प्रतिज्ञापत्र ( नमुना अ ), उमेदवार शासकीय सेवेत असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र समक्ष हजर करावे व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे.

४. सफाईगार पदासाठी २० गुणांसाठी चाफल्य व साफसफाई घेण्याची तारीख जिल्हा न्यायालयाचे सुचना फलकावर व https://districts.ecourts.gov.in/yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

५. सफाईगार पदासाठी तोंडी मुलाखती करीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

महत्वाच्या सुचना


१. नोंदणी क्रमांक" हा अर्जातील रकाना कार्यालयाव्दारे भरण्यात येईल. अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, यवतमाळ यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.

2. ओळखपत्र असल्याशिवाय चाफल्य परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.

3. उमेदवाराने स्वतःचा पुर्ण पत्ता पिनकोडसह व भ्रमणध्वनी (असल्यास) लिहीलेला व रु.२५/- चे पोस्टाचे तिकीट चिटकवलेला लिफाफा स्वतःचा पत्ता लिहीलेला आर.पी.ए.डी. च्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा.


सफाई कामगार या पदासाठी जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे एकूण नऊ पदासाठी भरती होणार आहे. 

Post a Comment

0 Comments