डोळ्यामध्ये मास वाढणे म्हणजे काय ? Mass growing in eye


मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये डोळ्यांमध्ये मास वाढणे किंवा पडदा वाढणे याविषयीची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो डोळ्यांमध्ये मास किंवा पडदा  का वाढते, डोळ्यामध्ये मास वाढल्यानंतर त्याचा काय त्रास होतो, डोळ्यामध्ये मास वाढू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवेत किंवा काय उपचार घ्यायला हवेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये बघणार आहोत. मित्रांनो तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन  ग्रुप वर जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता त्यामुळे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओज किंवा लेख लवकरात लवकर मिळतील.


डोळ्यामध्ये मास वाढणे म्हणजे काय ?


डोळ्यांमध्ये मास वाढणे याला विज्ञानाच्या भाषेमध्ये Pterygium असे आपण म्हणत असतो. डोळ्यामध्ये मास हे एलर्जी मुळे वाढत असते. मास शक्यतो नाकाच्या साईडने वाढते परंतु कधीकधी हे मांस दोन्ही साईडनेही असू शकते. मास वाढल्यामुळे रुग्णाला डोळ्याला नेहमी खाज येणे, डोळ्याला नेहमी लाली येणे, डोळ्यांमध्ये जळजळ करणे, डोळ्याला पाणी येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात.


डोळ्यामध्ये मास का येते ?


ज्या व्यक्तीचे काम खूप जास्त प्रमाणामध्ये हवेमध्ये किंवा दमट हवामानात असते, उन्हामध्ये, आणि धुळे मध्ये असते अशा व्यक्तीमध्ये डोळ्यांमध्ये मास येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. डोळ्यात मास येणे हे एक Degenerative Condition आहे यामध्ये डोळ्याला एलर्जी होऊन डोळ्यात मास वाढते.


डोळ्यामधील अश्रूंची निर्मिती चालू असते परंतु काही वेळा डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणून डोळे नेहमी लाल होत असतात त्यामुळे ही डोळ्यांमध्ये मास वाढते.


डोळ्यामध्ये मास वाढल्याची लक्षणे कोणती ?


डोळ्यामध्ये मास वाढायला सुरुवात झाली की डोळे नेहमी लालसर दिसतात, डोळ्यांना थोडी हवा लागली किंवा उन्हात गेल्यानंतर डोळे लगेच लाल होतात, डोळ्याला खाज यायला लागते त्यासोबतच पाणी येते, आणि रुग्णाला डोळ्यांमध्ये लालसर पडदा आल्यासारखा वाटतो ही काही डोळ्यांमध्ये पडदा वाढल्याची लक्षणे आहेत.


डोळ्यामध्ये पडदा वाढू नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी ?


डोळ्यामध्ये पडदा वाढणे हे एक एलर्जी मुळे होत असते परंतु डोळ्यांमध्ये पडदा येऊ नये म्हणून आपण खालील प्रमाणे काळजी घेऊ शकतो त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये पडदा येणे आपण टाळू शकतो.


1. गाडी चालवताना नेहमी सनग्लासेसचा किंवा गॉगल चा वापर करणे आवश्यक आहे.

2. धूळ धूर आसलेल्या ठिकाणी काम करते वेळेस गॉगल किंवा चष्म्याचा वापर करावा.

3. गाडी चालवून आल्यानंतर किंवा धूळ धूर अशा ठिकाणाहून काम करून आल्यानंतर लगेच थंड पाण्याने डोळे धुवायला हवेत.

4. चष्म्याचा नंबर असल्यास चष्म्याचा नंबर नेहमी वापरावा.

5. जर तुम्हाला डोळ्यामध्ये नेहमी लाली येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांमध्ये टाकण्यासाठी लुब्रिकेटिंग आय ड्रॉप वापरावा.

6. ज्या व्यक्तीचे काम गरम वातावरणात आहे अशांनी वारंवार डोळे धुवावेत.


डोळ्यामध्ये पडदा वाढला की त्यावर काय उपाय करायला हवेत ?


डोळ्यामध्ये पडदा वाटला असेल तर त्वरित नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यामध्ये आलेल्या पडद्याची वाढ ही हळूहळू जास्त होत असते आणि ती एक वेळेस डोळ्याच्या बुबुळावर चढते त्यामुळे रुग्णाला कधी कधी दिसायलाही त्रास होतो. 


जर डोळ्यातील पडदा हा बुबुलावर चढला नसेल तर डॉक्टर तुम्हाला डोळ्यांमध्ये टाकण्यासाठी औषधी देतील परंतु जर पडद्याची वाढ ही जास्त झाली असेल आणि तो बुबुळा वर गेला असेल तर अशा वेळेस मात्र डोळ्याची पडदा काढण्याची शस्त्रक्रिया ही करावी लागते. अशा वेळेस डोळ्यावरील पडदा शस्त्रक्रियेने काढल्यानंतरही बूबुळा वर टीक पडत असते त्यामुळे डोळ्यात पडदा आल्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे व त्यांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे.


डोळ्यातील पडदा काढण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतरही डोळ्या वरती पडदा येण्याची शक्यता असते त्यामुळे गाडी चालवताना, धूळ धूर अशा ठिकाणी काम करत असताना, गरम किंवा दमट हवामानात काम असल्यास गॉगलचा, चष्म्याचा वापर करावा त्यामुळे डोळ्यांमध्ये पडदा येण्याची शक्यता कमी होते त्याबरोबरच दिसायलाही चांगले दिसते.


Post a Comment

0 Comments