राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परभणी येथे 18 पदांची पदभरती जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परभणी येथे एकूण 18 पदाची पद भरती होणार आहे


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परभणी येथे 18 पदांची पदभरती जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी ११ महिने २९ दिवस कालावधीकरीता खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. सदर पदे परभणी जिल्हयातील आरोग्य संस्थास्तरावरील आहेत.

PDF डाऊनलोड करा

एकूण अठरा पदाकरिता ही भरती होणार आहे यामध्ये खालील प्रमाणे रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत.

1) Hospital Manager -01 (open-01)

2) DEIC Manager -01 (Open-01)

3) CPHC Consultant -01 (open-01)

4) Medical Officer Ayush PG -01 (Open-01)

5) Medical Officer Ayush UG -01 (SC-01) 

6) Medical Officer RBSK (MO) -01 (SC-01)

7) Medical Officer RBSK (LMO)-04 (SC-01,ST-01,VJ-A-01,OBC-01)

8) Audiologist -02 (SC-01, Open-01)

9) Staff Nurse (Female) -24 (SC-3,ST-2,VJ-A-1,NT-C-2,OBC-4,EWS-8,Open-4)

10) Staff Nurse (Male) -02 (OBC-01,EWS-01)

11) Physiotherapists -03 (SC-01, ST-01, Open-01)

12) Supervisor(STS) -01 (Open-01) 

13) Dental Technician -01 (Open-01)

14) Block Accountant -01 (Open-01)

15)Optometrist-01 (Open-01)

16) Social Worker -03 ((VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, EWS)-01, Open-02

17) Pharmacist - 02 (OBC-01, EWS-01)

18) Block Facilitator -02 (Open (Female) -02)


सदरील पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारा कडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर जाहिरात तसेच अर्ज करावयाचा नमुना www.zpparbhani.gov.inwww.parbhani.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता


अटी व शर्ती :-

१) वरील नमुद सर्व पदे ही राज्यशासनाची पद नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची ११ महिने २९ दिवसाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहनार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही. तसेच अर्जदाराला शासकिय नियमित सेवेत सामावुन येणे बाबत किंवा शासना मार्फत सेवा संरक्षण किंवा सेवा संरक्षणासंबंधि दावा करण्याचे अधिकार राहणार नाहीत.

२) सदर पदे ही कार्यक्रमांतर्गत पीआयपी सन २०२२-२३ च्या मंजुरीच्या अधिन राहून भरण्यात येत आहे. सदर प्रकल्प केंद्र शासनाने अथवा राज्यशासनाने नामंजुर केल्यास तसेच बंद झाल्यास किंवा सन २०२३-२४ करीता सदरील पदांना मंजूरी अप्राप्त राहील्यास वरील सर्व पदांची कंत्राटी सेवा कोणतीही पूर्व सुचना न देता आपोआप संपुष्टात येईल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

३) जाहीरातीत नमुद पदांची संख्या, पद ठिकाण व मानघन यामध्ये बदल होऊन कमी अथवा जास्त होऊ शकते, तसेच सदरची भरती रद्द करणे/स्थगीत करणे, निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करणे, निवड प्रक्रियेसंबधित कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीकडे राखुन ठेवण्यात आलेले आहेत. निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती सेवा कालावधीत रद्द करण्याचा अथवा चालू ठेवण्याचा अंतीम अधिकार निवड समिती अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांच्याकडे राखून ठेवला आहे. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.

४) पदासाठीचे मानधन हे एकत्रित मानधन आहे, मंजुर पीआयपीच्या अनुषंगाने मानधन ठरविण्याचे अधिकार निवड समितीने राखुन ठेवले आहे.

(५) ज्या आशा स्वयंसेविकांनी जीएनएम कोर्स पुर्ण केलेला आहे, त्यांना जीएनएम पद भरतीमध्ये वयाची अट राहणार नाही, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जीएनएम कोर्स करण्याकरिता शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या उमेदवारास सदर पदभरतीमध्ये प्राध्यान्य देण्यात येईल.

६) वैद्यकिय अधिकारी व स्टाफ नर्स करीता शासकिय सेवेतून सेवानिवृत्त/स्वेच्छा सेवानिवृती कर्मचारी अर्ज करीत असल्यास त्यांनी शासकिय सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, कार्यकाळ, पदनाम, सेवा निवृत्त झाल्याचे वर्ष सेवा निवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन व सेवा निवृत्ती नंतर देय असलेले वेतन ( पेन्शन) आणि यापूर्वी कंत्राटी पध्दतीने कोणत्याही कार्यक्रमात काम केलेले असल्यास त्याबाबतची सर्व माहिती अर्जामध्ये नमूद करावी आणि त्याच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्यात.

७) सेवानिवृत्त कर्मचारी यांची निवड झाल्यास त्याचे मानधन राज्यस्तरावरुन प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार मोजमाप करुन अदा करण्यात येईल. सेवा निवृत्त कर्मचारी यांची निवड झाल्यास त्यांच्या सेवा काळामध्ये अथवा सेवानिवृत्ती नंतर कोणत्याही स्वरुपाची चौकशी अथवा प्रकरण प्रलंबित नसल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याकरीता मा. आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल सदर प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाल्यानंतरच संबंधितास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल. तसेच रुजू होण्याकरीता त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, परभणी यांचे शारिरीक व मानसिक दृष्टया सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 

८) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा.

९) अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य देण्यात येईल. उक्त नमुद प्रत्येक पदासाठी राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा संख्येत उपलब्ध न झाल्यास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मा. सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे पत्र क्र. राआसो/मनुष्यबळ / आरक्षण/ २४५६४-७७४ / १६ दिनांक २०/०७/२०१६ रोजीच्या पत्रानुसार उपलब्ध उमेदवरातुन तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातुन नियुक्ती केली जाईल.

१०) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना ५ वर्षे शिथील, M.B.B.S ७० वर्षे, नर्स पदासाठी ६५ वर्षे, तसेच इतर नमुद कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे तसेच मागासवर्गीय ४३ वर्ष राहिल, तसेच नर्स पदासाठी ६० वर्षावरील अर्जदारांकरीता जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणित शारिरीक योग्यता ( Physical Fitness )

प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

११) उपरोक्त पदभरतीबाबत असलेल्या सर्व सूचना हया जिल्हा परिषद, परभणीचे अधिकृत संकेतस्थळ www.zpparbhani.gov.inwww.parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांना कोणत्याही सूचना, दुरध्वनी निरोप, एसएमएस किंवा ईमेल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळास भेट देऊन माहिती घेणे अनिवार्य राहील.

१२) अर्जा सोबत उमेदवाराने अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु.१५०/- व मागासवर्गीय रु.१००/- चा ना परतावा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) जोडावा. चेक अथवा डिडि काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राहय धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

१३) अर्जदाराने अर्ज सादर करतेवेळेस जिल्हा परिषद परभणी अथवा एनआयसी परभणी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीमधील अर्जाचा नमुन्यामध्ये उमेदवाराचे अर्ज स्विकारले जातील इतर कोणत्याही नमुन्यामध्ये

उदा. स्वतःचा टंकलिखीत केलेला, नमुन्यामध्ये बदल असलेला इतर अर्ज विक्री केंद्राच्या नावानुसार असलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी..

१४) सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकीत छायाप्रतीसह अर्ज खालील पत्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांक दि.०२/०६/२०२३ पासुन ते दि. १२/०६/ २०२३ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेच्या आत जमा करावा ( कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून). विहीत मुदतीच्या नंतर स्वहस्ते / पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

१५) उमेदवाराला एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास अर्ज वेगवेगळया डिमांड ड्राफसह सादर करावा, परंतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत किंवा परिक्षा घेतली गेल्यास कोणत्याही एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहीला त्या पदाकरीता संबधित उमेदवार ग्राहय धरला जाईल.

१६) वयाचा पुरावा म्हणून उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (सनद) सादर करावी अथवा ज्यावरून उमेदवाराची जन्मतारीख ग्राहय धरणे सोईस्कर होईल अशा पध्दतीचे प्रमाणपत्र सादर करावे. 

१७) अर्जदाराने अर्ज करते वेळी स्वतःचे नाव, जन्म तारीख, जातीचा प्रवर्ग, अर्जदाराचा संपुर्ण पत्ता, अर्ज कोणत्या पदासाठी केला आहे, कोणत्या प्रवर्गातुन केला आहे व सही हे स्पष्ट व ठळक अक्षरात नमुद करावे. पासपोर्ट साईज फोटो व साक्षांकित प्रत सोबत जोडतांना स्पष्टपणे दिसतील असे जोडावे.

१८) शैक्षणिक अर्हतेचा संपुर्ण तपशिल - अभ्यासक्रमांचे नाव, संस्था / विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणाची टक्केवारी, DD (राष्ट्रीयकृत बँकेचा) चा तपशील. अंतीम वर्षाचे गुण दर्शविणारे सर्व गुणपत्रके आवश्यक असेल. जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ. झेरॉक्स प्रती साक्षांकित करुन सोबत जोडावे, अपूर्ण व चुकीच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

१९) कामाचा अनुभव संबधित पदाशी निगडीत अनुभव फक्त शासकिय अथवा NHM चा ग्राहय धरला जाईल. - अनुभव प्रमाणपत्र संस्थेप्रमुखाच्या सही व शिक्याने जावक क्र. व कालावधी व पदाचे नाव ठळक पणे असावेत. उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला असेल त्याच पदाचा अनुभव ग्राहय धरला जाईल, तसेच नियुक्ती काळातील उमेदवाराला कमीत कमी तिन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट सोबत जोडणे बंधनकारक असेल, तसेच आवश्यकतेनुसार सादर केलेला अनुभव पडताळणीसाठी संबधित संस्थेला पाठविले जाईल. पडताळणी मध्ये चुकीचा अथवा दिशाभुल करणारे प्रमाणपत्र आढळल्यास निवड समिती कोणत्याही स्तरावर उमेदवारास भरती प्रक्रियेमधून अथवा निवड केल्यानंतर कोणत्याही स्तरावरून नियुक्ती रदद् करण्यात येऊन निवड समिती मार्फत संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

२०) नोंदणी प्रमाणपत्र :- वैद्यकिय अधिकारी / स्टाफनर्स पदासाठी तसेच ज्या पदासाठी नोंदणी व नुतनिकरण आहे अशा सर्व पदासाठी नोंदणी व नुतनिकरण अनिवार्य असेल.

२१) संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT चे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.

२२) पदासाठी गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवडीच्या निकषानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येईल.

२३) नियुक्ती आदेश देण्यापुर्वी मुळ कागदपत्र पडताळणी होईल, उमेदवारांनी जोडलेल्या प्रमाणपत्रामध्ये दोष अथवा चूकीचे प्रमाणपत्र / दिशाभूल केल्याचे प्रमाणपत्र आढळून आल्यास उमेदवाराची निवड / नियुक्ती तात्काळ रद्द करुन संबधितावर कायदेशिर कार्यवाही केली जाईल.

२४) सदर भरतीप्रक्रिया पुर्ण झाली असता एका वर्षाच्या आत एखादया ठिकाणी कर्मचारी यांनी राजिनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले असता गुणानुक्रमे प्रतिक्षायादीवरील उमेदवारास नियुक्ती आदेश दिला जाईल. प्रतिक्षायादी प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून एका वर्षाकरीता वैद्य राहील.

२५) निवडी नंतर अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोई नुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.

जाहिरातीचे संपूर्ण पीडीएफ डाऊनलोड करा


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परभणी येथे एकूण 18 पदासाठी भरती होणार आहे.

Post a Comment

0 Comments