डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दीन सप्ताह 10 जून ते 16 जून

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दीन सप्ताह 10 जून ते 16 जून 

दिनांक 10 जून ते 16 जून या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी संपूर्ण देशात अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दीन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताह निमित्त संपूर्ण नागरिकांमध्ये डोळ्याच्या वेगवेगळ्या आजाराविषयी आणि त्यांच्या उपचाराविषयीची माहिती प्रसारित करण्यात येते. डोळ्याच्या आजाराचे जर वेळीच निदान झाले तर त्यामुळे होणारे परिणाम तसेच डोळ्याची दृष्टी वाचवण्यास मदत होते.

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दीन सप्ताह 10 जून ते 16 जून


या सप्ताह निमित्त आपण आज डोळ्यांचे वेगवेगळे आजार आणि त्यावरील उपाय कोणते आणि काय उपाययोजना करायला हव्यात, आजार होऊ नये म्हणून काय प्रतिबंध करायला हवा, आणि आजार असल्यास काय काळजी घ्यायला हवी याविषयीची माहिती आपण आज थोडक्यात बघणार आहोत.


1. मोतीबिंदू : 

• मोतीबिंदू हा आजार खूप साधारणपणे आढळून येणारा आजार आहे यामध्ये साधारणतः पन्नास वर्षांवरील व्यक्तींना आजार होतो.

• वयोमानानुसार डोळ्यातील लेन्स अपारदर्शक होणे आणि त्यामुळे रुग्णाला दिसायला अंधुक होते यालाच आपण मोतीबिंदू झाला असे म्हणतो.

• काही वेळा डोळ्याला मार लागल्यामुळे, सूर्यग्रहण बघितल्यामुळे, Steroid चे औषध जास्त वेळ घेतल्यामुळे ही मोतीबिंदू होऊ शकतो.

• काही लहान मुलांमध्ये ही जन्मताच मोतीबिंदू असण्याची शक्यता असते अशा बालकांवर जर वेळीच उपचार करण्यात आले तर त्यांची दृष्टी वाचवण्यास मदत होते परंतु जर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर डोळ्याला amblyopia हा आजार होतो. या आजारामध्ये रुग्णाची गेलेली नजर परत मिळविणे शक्य होत नाही त्यामुळे वेळेत उपचार करणे हाच यावरती योग्य उपाय आहे.

• लहान मुलांमध्ये मोतीबिंदू होण्याची कारणे म्हणजे गरोदरपणी मातेने जर स्टेरॉईडचे औषध घेतले असतील, सूर्यग्रहण किंवा हानिकारक किरणशी संपर्क आला असेल, प्रसूतीच्या वेळेस बाळाला मार लागला असेल या कारणामुळे लहान मुलांमध्येही मोतीबिंदू होतो.

• जगभरात मोतीबिंदू या आजारामुळे खूप जास्त व्यक्ती ग्रासलेले आहेत परंतु मोतीबिंदू या आजारावर शस्त्रक्रियेने यशस्वीरित्या उपचार करता येतात. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णांची पूर्ण दृष्टी परत मिळवता येते.

2. काचबिंदू : 

• डोळ्यातील दाब वाढल्यामुळे डोळ्याची नस खराब व्हायला लागते आणि रुग्णाला आजूबाजूचे दिसायला कमी होते यालाच आपण काचबिंदू झाला असे म्हणतो.

• काचबिंदू झालेल्या रुग्णाच्या डोळ्याला ठणक असते डोळा दुखतो, पाणी येते, आजूबाजूची दृष्टी कमी असते.

• डोळ्यात काचबिंदू होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे डोळ्यात Aqueous Humour चे जास्त प्रमाणात तयार होणे हे आहे.

• काचबिंदू हा डोळ्याचा एक गंभीर आजार आहे यालाच आपण दृष्टी चोर असेही म्हणतो कारण की या आजारांमध्ये संपूर्ण दृष्टी कमी होईपर्यंत रुग्णाला आजार झाला आहे हे कळत नाही.

• या आजारावर औषधोपचार करून आणि काही प्रकारच्या शस्त्रक्रिया करूनही उपचार करता येतात.  

• आजारामध्ये लवकरात लवकर निदान झाले तर रुग्णांना उपचाराचा अधिक फायदा होतो दृष्टि वाचवता येते.

3. तिरळेपणा

• जेव्हा एक डोळा सरळ समोर बघतो, तेव्हा दुसरा डोळा आत किंवा बाहेर वळतो त्याला तिरळेपणा म्हणतात.

• तिरळेपणा हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो.

• दिसायला कमी असणे, एका डोळ्याची नजर कमी असणे, डोळ्यातील स्नायूची ताकद कमी असणे यामुळे तिरळेपणा होण्याची शक्यता असते.

• तिरळेपणा असणाऱ्या बालकांची तपासणी करून त्यांना चष्म्याचा नंबर वापरून तिरळेपणा दूर करता येतो. काही वेळेस चष्म्यामध्ये प्रिझम नावाची लेन्स वापरल्या जाते.

• तिरळेपणा जास्त असेल तर तिरळेपणाची शस्त्रक्रिया ही केली जाते.


4. बुबुळावर टिक पडणे 

• डोळ्याचा सर्वात समोरील भाग म्हणजे बुबुळ त्यालाच आपण कॉर्निया असेही म्हणतो.

• कॉर्नियाला मार लागला, डोळ्यात कचरा गेला, किंवा जंतू संसर्ग होऊन पारदर्शक असलेल्या कॉर्निया अपारदर्शक होतो ( पांढर होते) त्यालाच आपण डोळ्यांमध्ये फुल पडले किंवा टिक पडणे असे म्हणतो.

• डोळ्यात फुल पडले असेल तर यावर उपाय म्हणजे शस्त्रक्रिया करून काढता येते यामध्ये नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे बुबुळ लावल्या जाते.

• डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून किंवा डोळ्याला इजा होऊ नये म्हणून गाडी चालवताना नेहमी डोळ्याला गॉगल्स लावावा.

• डोळ्यात कचरा गेल्यास लवकरात लवकर नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा.


5. Amblyopia - आळशी डोळा

• आळशी डोळा म्हणजे संपूर्ण डोळा साधारण असतानाही डोळ्याची नजर नसणे याला आपण आळशी डोळा असे म्हणतो.

• लहान मुलांमध्ये जन्मताच मोतीबिंदू असणे किंवा एकाच डोळ्याचा वापर केल्यामुळे आळशी डोळा होतो.

• आळशी डोळ्याची जर लवकरात लवकर उपाय केले तर त्याची दृष्टी परत मिळवता येते परंतु जर यामध्ये डोळ्याचे निदान उशिरा झाले तर उपचाराचा काहीही जास्त उपयोग होत नाही.

• काही वेळा एका डोळ्याची नजर असते परंतु दुसऱ्या डोळ्याची नजर कमी असते त्यामुळे रुग्णाला नजर कमी असल्याचे भासत नाही आणि त्यामुळे आळशी आळशी यासारख्या आजाराचे निदान उशिरा होते.

• आळशी डोळा असलेल्या रुग्णांमध्ये तिरळेपणा असण्याची शक्यता असते.

• आळशी डोळा या आजारावर उपचार म्हणजे जो नॉर्मल डोळा आहे त्याला पॅच करून बंद केल्या जाते व ज्या डोळ्याची नजर कमी आहे त्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करावा लागतो त्यामुळे त्याची दृष्टी वाढण्याची शक्यता असते.

• त्यामुळे आळशी डोळा यामध्ये महत्त्वाचे उपचार म्हणजे डोळ्याला patching करणे हे होय.


 10 जून ते 16 जून डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह निमित्त थोडक्यात डोळ्याच्या आजाराविषयी ची माहिती.

या सप्ताह निमित्त सर्वांनी डोळ्यांच्या आजाराविषयी ची माहिती प्रसारित करावी व डोळ्यांचे आजार उद्भवलेले असतील तर लवकरात लवकर नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरून लवकरात लवकर उपचार करून आपल्या दृष्टीचे रक्षण करता येईल. 


           ज्ञानेश्वर भगवान पोटफोडे           नेत्र चिकित्सा अधिकारी 

         






Post a Comment

0 Comments