▶️ महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाने राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिदोष नियंत्रण कार्यक्रम (NPCBVI) अंतर्गत नेत्रपेढी, नेत्र संकलन केंद्रे आणि नेत्र प्रत्यारोपण केंद्रांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहे.
▶️ राज्यात नेत्रपेढी नेत्र पेढी/नेत्र संकलन केंद्र द्वारे नेत्र बुब्बुळे जमा करण्यात येतात व नेत्र प्रत्यारोपण केंद्रांमार्फत नेत्र प्रत्यारोपण करण्यात येते.
▶️ तरी सदर पत्राव्दारे आपणास कळविण्यात येते की, आपल्या जिल्हयातील सर्व नेत्र पेढी/नेत्र संकलन केंद्र/नेत्र प्रत्यारोपण केंद्र यांना आपल्या स्तरावरुन खालील सुचना निर्गमित करण्यात याव्यात.
१. राज्यातील सर्व नेत्र पेढीची / नेत्र प्रत्यारोपण केंद्रांनी नोंदणी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ "सुधारीत २०१४ अंतर्गत करण्यात यावी.
२. नेत्र पेढ्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एका वर्षात कमीत कमी १०० नेत्र बुब्बुळे जमा करण्यात यावीत. तसेच नेत्रपेढीने जनतेस दिवसरात्र (२४४७) सेवा पुरविण्यात यावी. नेत्र पेढीकडे नेत्र बुब्बुळे प्राप्त झाल्यावर त्या बुब्बुळांवर प्रक्रिया करुन त्यांचे मुल्यांकन करण्यात यावे.
३. नेत्र पेढी/नेत्र प्रत्यारोपण केंद्रांनी आपले प्रमाणपत्र संपुष्टात (Expired) होण्याच्या ३ महिने पुर्वी नुतनीकरणाचे प्रस्ताव सबंधित उपसंचालक, आरोग्य सेवा यांचे कडे सादर करावा.
४. नेत्र पेढी/नेत्र संकलन केंद्र/नेत्र प्रत्यारोपण केंद्रांनी आपला बिनचुक भौतिक अहवाल विहित प्रपत्रात दरमहा संबंधित जिल्हा आरोग्य सोसायटी (अंनिका) यांना ५ तारखेच्या आत सादर करावा. नेत्र पेढीने जमा केलेली नेत्र बुब्बुळे रकाना क्र.१ मध्ये दर्शविण्यात यावी. नेत्र संकलन केंद्र / इतर नेत्र पेढी यांचे मार्फत प्राप्त नेत्र बुब्बुळे रकाना क्र.२ मध्ये दर्शविण्यात यावा. जेणे करुन report Duplication होणार नाही.
1. No.of Eye Balls Collected
2. Eye Ball Received from Other Institute
3. Cornea Found Suitable for Surgery
4. No.of Eye Balls used for other Purpose
5. No.of Eye Balls Discarded
6. No. of Κ.Ρ. Surgery Done
५. नेत्र पेढी / नेत्र प्रत्यारोपण केंद्रांनी केंद्र शासनाच्या npcbvl.gov.in वर नोंदणी करुन दरमहा माहिती अदयावत करण्यात यावी.
६. जिल्हा आरोग्य सोसायटी (अंनिका) यांनी नेत्रपेढी सोबत ५ वर्षाकरीता करारनामा करण्यात यावा.
७. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नेत्र पेढीस प्रती बुब्बुळे रु.१००० इतके (प्रती जोडी रु.२०००/-) मानधन वाटप करण्यात येते. सदर अनुदानातून नेत्रपेढीमधील कार्यरत कर्मचा-यांकरीता मानधन, साधन सामुग्री, एम. के. मिडीया, वाहन इंधन व वंगण / प्रवासभाडे तसेच इतर आकस्मित खर्च करण्यात यावा. तसेच नेत्रपेढीने ज्या नेत्र संकलन केंद्र / नेत्र जमा करणारे केंद्र कडुन नेत्र बुब्बुळे प्राप्त होतात त्यांना प्रती नेत्र बुब्बुळे रु.५००/- (प्रती जोडी रु.१०००/-) अदा करण्यात यावेत.
८. नेत्र संकलन केंद्र यांनी प्रती नेत्र बुब्बुळे रु.५००/- (प्रती जोडी रु.१०००/-) प्राप्त अनुदानातून नेत्र संकलन केंद्र मधील कार्यरत कर्मचा-यांकरीता मानधन, साधन सामुग्री, एम. के. मिडीया, वाहन इंधन व वंगण / प्रवासभाडे तसेच इतर आकस्मित खर्च करण्यात यावा.
९. जिल्हा आरोग्य सोसायटी (अंनिका) यांनी नेत्र पेढीस एकुण जमा नेत्र बुब्बुळे यांचे अनुदान वितरीत करण्यात यावे. (नेत्रपेढी मार्फत जमा बुब्बुळे नेत्र संकलन केंद्र यांचे मार्फत जमा नेत्र बुब्बुळे) जेणेकरुन नेत्र पेढी यांना नेत्र संकलन केंद्रयांचे मार्फत प्राप्त नेत्र बुब्बुळांचे अनुदान वितरीत करणे शक्य होईल.
१०. नेत्र पेढी / नेत्र संकलन केंद्र यांनी नेत्रप्रत्यारोपण करता येतील असे (Quality Eye balls) जमा करण्यावर भर देण्यात यावा, जेणे करुन जमा नेत्र बुब्बुळे व प्रत्यारोपण शस्त्र क्रिया यामधील तफावत कमी होईल.
११. जिल्ह्यातील सर्व नेत्र पेढी व नेत्र संकलन केंद्र यांनी ज्या जिल्हयात नेत्र बुब्बुळे जमा करण्यात आली त्या जिल्हयात माहिती देण्यात यावी व नेत्र प्रत्यारोपण ज्या जिल्हयात करण्यात आले त्या जिल्ह्यात माहिती देण्यात यावी.
१२. नॅशनल ऑर्गन अॅन्ड टिश्यु ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली यांच्या दि.१५.१०.२०२४ च्या मार्गदर्शक सुचनांनुसार एका आय रिट्रायवल सेंटरने एकाच आय बँकेंशी सलग्न असावे, एकापेक्षा जास्त आय बँकेशी सलग्न असू नये.
१३. बेकायदेशीर रित्या डोळे काढण्याच्या उपक्रमात (Eye Retrieval Activities) सहभागी असलेल्या संस्थांवर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ सुधारणा २०११ मधील कलम १८ (C) नुसार कार्यवाही उपसंचालक, परिमंडळे यांचे मार्फत करण्यात यावी. तसेच उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे दरमहा होण्या-या बैठकीमध्ये आपल्यास्तरावर आढावा घेण्यात यावा.
गाईडलाईन डाऊनलोड करा (Download)
Tags:
Eye Bank Guidelines