प्रतिक्षा सुची प्रसिध्द करुन नियुक्तीसंबंधी कार्यवाहीबाबत.

प्रतिक्षा सुची प्रसिध्द करुन नियुक्तीसंबंधी कार्यवाहीबाबत.

प्रतिक्षा सुची प्रसिध्द करुन नियुक्तीसंबंधी कार्यवाहीबाबत.


शासनाचे संदर्भाधीन पत्राने प्रतिक्षा सुची तयार करण्याच्या कार्यपध्दतीबाबत दिलेल्या सुचनांनुसार सर्व नियुक्ती प्राधिका-यांची दिनांक ०५/४/२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदरील बैठकीत प्रतिक्षा सुची तयार करणेसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच या कार्यालयाचे दिनांक १९/४/२०२४ रोजीच्या पत्राने सदरील बैठकीतील इतिवृत्तानुसार पुढील कार्यवाही करणेबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सूचना दिले आहेत. दिनांक २७ ते २९ मे,२०२४ या कालावधीत सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख यांचेकडील गट-क व ड संवर्गाची प्रतिक्षा सूची तयार करणेसंबंधी पुनश्च आढावा घेण्यात आलेली आहे. तसेच दिनांक ०५/६/२०२४ रोजी प्रतिक्षा सुची संदर्भात व्हीसी बैठकीव्दारे आढावा घेण्यात आले आले आहे. तरी प्रतिक्षा सुची संदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.


१) सर्व उपसंचालक परिमंडळे व कार्यक्रम प्रमुख दिनांक १०/६/२०२४ रोजी सायंकाळ पर्यंत प्रत्येक पदांचे प्रतिक्षा सुची अंतिम करुन त्यांची सही शिक्क्यानिशी पीडीएफ कॉपी सादर करण्यात यावे.

2) प्रतिक्षा सुची अंतिम झाल्यानंतर त्या-त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर १०/६/२०२४ पासुन प्रसिध्दीस देण्यात यावे.

३) प्रतिक्षा सुचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेमार्फत दिनांक १०/६/२०२४ ते २२/६/२०२४ पर्यंत पुर्ण करण्याचे खबरदारी घेण्यात यावी.

४) प्रत्येक मंडळाकडील प्रतिक्षा सुचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रीकव्दारे फोटो व अंगठा पडताळणी करिता नियोजन करुन तसे मे. टिसीएस यांना कळविण्यात यावे व नियोजनानुसार आधार बायोमेट्रीक्स तपासणी करुन घेऊन पात्र उमेदावरांना नियुक्तची कार्यवाही करावी. नियुक्ती आदेश देण्याची संपूर्ण कार्यवाही दिनांक २२/६/२०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी.

५) सध्यस्थितीस मुंबई, ठाणे व नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणूकीचे आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या व्यतिरिक्त उर्वरित मंडळांकडील प्रतिक्षा सुचीवरील उमेदवारांचे नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments