नेत्रचिकित्सा अधिकारी, गट-क संवर्गातील सरळसेवा भरती अन्वये पात्र ठरलेल्या उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया

नेत्रचिकित्सा अधिकारी, गट-क संवर्गातील सरळसेवा भरती अन्वये पात्र ठरलेल्या उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया

नेत्रचिकित्सा अधिकारी गट-क सरळसेवा भरती वर्ष २०२३-२०२४.

उपरोक्त विषयान्वये व संदर्भान्वये नेत्रचिकित्सा अधिकारी, गट-क संवर्गातील सरळसेवा भरती अन्वये पात्र ठरलेल्या उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया आयुक्तालयात दि.२७.०२.२०२४ ते दि.२८.०२.२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. तद्‌नुसार समुपदेशनाअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबतची कार्यवाही आपले स्तरावरुन करण्यात यावी, तसेच सदर नियुक्ती आदेशाची प्रत या आयुक्तालयास सादर करावी. (सोबत ६१ उमेदवारांची यादी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.)

1. विवरणपत्र अ निवड झालेल्या उमेदवारांची मंडळनिहाय यादी

2. विवरणपत्र ब सहसंचालक, आरोग्य सेवा (ह. हि.व जलजन्य रोग), पुणे यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निकालाची प्रत तसेच उर्वरीत ईडब्ल्यूएस/खेळाडू/अशंकालीन /भुकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांची तसेच काही खाजगी विद्यापीठातील उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणी संबधित कार्यालये/विद्यापीठे यांचेकडे पडताळणीकरीता पाठविण्यात आले आहेत. संबधित कार्यालये / विद्यापीठे यांचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती आदेश देणेबाबत आपणास कळविण्यात येईल. तसेच उपरोक्त नुसार कार्यवाही करून तपशिलवार अहवाल या कार्यालयास सादर करावा.

Post a Comment

0 Comments