नेत्र चिकित्सा अधिकारी या पदासाठी निवड पदवी तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत..

नेत्र चिकित्सा अधिकारी या पदासाठी निवड पदवी तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत..

• नेत्र चिकित्सा अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना विद्यापीठातील पदवी तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत. 

• नेत्र चिकित्सा अधिकारी या पदासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 व दिनांक 28 फेब्रुवारी 2024 या दोन दिवशी कागदपत्र तपासणीसाठी आरोग्य भवन येथे सर्व निवड झालेल्या उमेदवारांना बोलविले होते. 

• कागदपत्र तपासणी तसेच समुपदेशनाच्या दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ यूजीसी मान्यताप्राप्त आहे किंवा नाही या प्रकारची तपासणी करण्याकरिता काही विद्यापीठातील उमेदवारांना त्यांची पदवीची कागदपत्रे तपासणी केल्यानंतरच निवड आदेश देण्यात येईल असे कळविले आहे. 

• आरोग्य विभाग संचालनालयाद्वारे विद्यापीठांना असे पत्र देऊन लवकरात लवकर माहिती द्यावी अशी कळविलेले आहे.

• आरोग्य विभाग संचालनालयाला खालील प्रमाणे माहिती हवी आहे.

1. बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री/ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री या अभ्यासक्रमाला U.G.C. ने मान्यता दिली आहे का?

2. होय असल्यास, अभ्यासक्रम कधीपासून ओळखला जातो?

3. कृपया U.G.C प्रदान केलेले मंजूरी पत्र.

• याव्यतिरिक्त, कृपया उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करा आणि त्यांच्या वैधतेबद्दल आपल्या टिप्पण्या द्या. (उमेदवारांची नावे आणि विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची यादी सोबत जोडली आहे.) 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठातील पदवी असलेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.


Post a Comment

0 Comments