सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या गट-क व गट-ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता राबविण्यात आलेल्या पदभरतीच्या निवडसूचीची विधीग्राह्यता दि.१६.०२.२०२५ पासून पुढे किमान ६ महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे.
२. त्यानुसार कळविण्यात येते की, गट-क व गट-ड संवर्गातील एकुण १०९३४ पदांची जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यापैकी ९५०६ पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्ती द्यावयाची शिल्लक पदे ११२ आहेत. उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या १३१६ नमुद केली असून त्याबाबत "४५ टक्के पेक्षा कमी गुण, अपंग असे नमुद केलेले आहे. त्यामुळे उमेदवार उपलब्ध न झालेल्या १३१६ पदासाठी निवडसूचीची विधीग्राह्यता वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते. तथापि, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०४.०५.२०२२ नुसार, परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करुन, निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्याची तरतूद आहे. उपरोक्त तरतुदीचा विचार करता, ४५ टक्के पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा विचार निवडसूचीसाठी करण्यात येत नाही. त्यामुळे निवडसूचीची विधीग्राह्यता नेमक्या कोणत्या उमेदवारांसाठी वाढवून द्यावयाची आहे, त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती
Tags:
आरोग्य विभाग भरती अपडेट