आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे होणार...

आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे होणार...

आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑनलाइन प्रकारे करण्याची सुरुवात झालेली आहे. यावर्षीपासून आरोग्य विभागातील गट क संवर्गातील बदल्या ह्या ऑनलाइन ॲपद्वारे होणार आहे. त्यासंबंधीचे आरोग्य सेवा संचालनालय यांचे पत्र ..

विषय : बदली प्रक्रिया संगणकीय प्रणाली द्वारे व्यवस्थित पार पडण्याकरिता संगणकीय आज्ञावली तयार करण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली प्रक्रिया संगणकीय प्रणाली द्वारे पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली द्वारे करण्याचे विचाराधीन आहे.

तरी सर्व संगणक आज्ञावली विकसित करणारे सेवा पुरवठादार महाआयटी, एन आय सी, डी आय टी कडील सेवा पुरवठादार, शासन मान्यता प्राप्त अन्य सेवा पुरवठादार संस्था अथवा खाजगी संस्था यांना याद्वारे कळविण्यात येते की, संगणक प्रणाली द्वारे सेवा पुरवठा करण्याकरिता दरपत्रक सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयात दहा दिवसात आर पी ए डी अथवा व्यक्तिशः पाठविण्यात यावे..

सेवा पुरवठा दराची निवड करताना कामाचा दर्जा, गुणवत्ता, सादरीकरण मुलाखतीद्वारे मिळालेला गुण व दर पत्रकातील दरांची तुलना करून योग्य त्या एजन्सीची निवड करण्यात येईल.

या दर पत्रकामध्ये बदली ॲप विकसित करणे, माहिती अध्यायात करणे व पुढील एक वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्ती करणे, ट्रबल शूटिंग, गोपनीयता क्लाऊड मध्ये संकलन व आपलिकेशन संबंधी इतर तदा संगीत तांत्रिक बाबीचा समावेश करून सर्व करा सहित एकूण नमूद करण्यात यावे.

आरोग्य सेवा संचालनालय यांच्या मार्फत आरोग्य विभागांतील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली द्वारे करण्यासाठीं कंन्यांबरोबर करार करण्याची सुरूवात झाली आहे त्यामूळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या लवकर ऑनलाईन होतील असे संकेत आहेत.

आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे होणार...


Post a Comment

0 Comments