डोळे लाल होण्याची ही आहेत कारणे आणि उपचार

डोळा लाल होणे

डोळा लाल होणे म्हणजेच डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या डोळा चोळल्यामुळे, ऍलर्जीमुळे किंवा जंतुसंसर्ग झाल्यामुळे रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि डोळा लाल दिसतो यालाच आपण असे म्हणतो.

डोळ्यातील रक्तवाहिन्या खूप लहान असल्यामुळे साधारणपणे त्या दिसत नसतात परंतु डोळा चोळल्यामुळे त्या मोठ्या होतात आणि दिसायला लागतात.

डोळा लाल होणे यालाच आपण Red eye असेही म्हणतात.

डोळे लाल होण्याची ही आहेत कारणे आणि उपचार


 खुप साऱ्या व्यक्तीला डोळा लाल होण्याचा त्रास जाणवत असतो. डोळे लाल होणे हे खूप साधारण आढळून येणारे डोळ्यांचे लक्षण आहे. डोळे लाल होणे यासोबतच आणखी  काही दुसरे लक्षण असतात जसे की डोळ्याला खाज येणे, डोळ्यात टोचणे, पाणी येणे, दिसायला अंधुक असणे.

डोळे लाल होण्याची ही आहेत कारणे

डोळे लाल होणे हा त्रास प्रामुख्याने धूळ धूर, जंतुसंसर्ग झाल्यामुळे, एलर्जी झाल्यामुळे, कचरा गेल्यामुळे, उन्हामुळे, हवा लागल्यामुळे, कोरडेपणा असल्याने, शस्त्रक्रिया झाल्यानंतर अश्या वेगवेगळ्या कारणामुळे डोळे लाल होऊ शकतात.

  • उन्हामुळे
  • गरम हवामानात काम केल्याने
  • डोळ्याला जंतुसंसर्ग झाल्यामुळे
  • डोळ्यामध्ये कचरा गेल्यामुळे
  • कोरडेपणा असल्यामुळे
  • हवा लागल्यामुळे
  • एलर्जी झाल्यामुळे
  • जास्त प्रमाणात मोबाईल वापरल्यामुळे
  • कॅम्पुटर तसेच लॅपटॉप वरती काम केल्यामुळे

मोबाईल वापरल्यामुळे डोळ्याची उघडझाप व्यवस्थितपणे होत नाही त्यामुळे डोळ्यांमध्ये अश्रू पसरविण्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे डोळे जळजळ होऊन डोळ्याला खाज येते आणि त्यामुळे डोळ्यावर लाली येते.

लहान मुलांमध्ये स्मार्टफोन वापरल्यामुळे तसेच डोळे मोठे करून बघितल्यामुळे, मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे डोळे लाली येऊ शकते त्यामुळे मोबाईलचा अतिरेक वापर होत नाही ना याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. 

स्मार्टफोनचा आणि डिजिटल मीडिया चा अतिरेक वापर केल्यामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे आळशी डोळा होणे, दिसायला कमी दिसणे, तिरळेपणा होणे, डोळे जळजळ करणे, लाल होणे असे त्रास होत असतात.

तसेच जर एखाद्या व्यक्तीचे काम कॅम्पुटर वरती किंवा लॅपटॉप वरती खूप जास्त वेळ असेल अशा व्यक्तीने प्रत्येक अर्ध्या तासाने आराम करावा आणि दूर बघावे किंवा दुसरीकडे बघावे जेणेकरून डोळ्याच्या पापणीची व्यवस्थित हालचाल होईल व डोळ्यांमध्ये अश्रू पसरविण्याचे काम व्यवस्थित होईल.


डोळे लाल होत असल्यास दुर्लक्ष करू नका


जर तुमचे डोळे वारंवार लाल होत असतील, डोळ्याला नेहमी खाज येत असेल, डोळ्यात नेहमी जळजळ करत असेल, डोळे नेहमी थकत असतील अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता याकडे बारकाईने बघणे आवश्यक आहे.

जर वारंवार डोळ्यावर नेहमी लाली येत असेल तर त्यासाठी जवळील नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवणे खूप आवश्यक असते.

ज्याच्याकडे जर दुर्लक्ष केले तर यामुळे त्रास होऊन डोळ्यांमध्ये मास वाढणे पडदा येणे किंवा वेल वाढणे असे आजार होऊ शकतात. डोळ्यात वेल वाढला असेल तर यासाठी केवळ शस्त्रक्रिया हाच उपचार आहे.

डोळे लाल होत असल्यास हे करा काही घरगुती उपाय


डोळे नेहमी लाल होत असतील तर डोळ्यावर थंड पाणी मारणे, गाडी चालवताना सन गॉगल्स वापरणे, उन्हामध्ये काम करताना फोटोसन (Photosun)  चा चष्मा वापरणे अशी काही घरगुती उपाय करू शकतात.

गरम हवामानात काम करत असताना नेहमी प्लास्टिक काचेचा चष्मा वापरावा जेणेकरून डोळ्याला गरम हवा लागू नये.

धुळीच्या ठिकाणी काम करत असताना डोळ्याला नेहमी सुरक्षित चष्मा वापरावा जेणेकरून डोळ्यामध्ये कचरा जाणार नाही, धूळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. डोळे वारंवार थंड पाण्याने धुवावे.

डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेनुसार तसेच सुचविल्याप्रमाणे टाकावी. डोळ्याची औषधी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं आवश्यक आहे.

डोळ्यांना दिसायला त्रास असेल तर नंबरचा चष्मा वापरणे.

डोळ्याला ॲलर्जी असेल तर त्यासाठी औषधे वापरणे.

डोळ्यामध्ये कचरा गेला असेल तर लवकरात लवकर जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवणे व त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डोळे लाल होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी

डोळे किमान दिवसात 3 ते 4 वेळा थंड पाण्याने धुवावे.

गाडी चालवताना गॉगल नेहमी वापरावा.

जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर करू नये

कॅम्पुटर वर तसेच लॅपटॉप वर काम करताना अधून मधून ब्रेक घ्यावा.

संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक


डोळ्यांची नियमीत काळजी कशी घ्यावी ?


ऑनलाइन शिकवणी दरम्यान आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?



Post a Comment

0 Comments