४. गर्भधारणेपूर्वी महिलेने फॉलिक ऍसिड चे सेवन का करायला हवे ?

गर्भधारणेपूर्वी फॉलिक ऍसिड चे सेवन

गर्भधारणेपूर्वी फॉलिक ऍसिड चे सेवन


फॉलिक ऍसिड हे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व पैकी एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. त्याची गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणा झाल्यानंतरही अधिक गरज असते. या जीवनसत्वाचा अभाव असल्यास जमणाऱ्या बाळांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासाच्या विकृती होण्याचे प्रमाण अधिक असते. मेंदू व मज्जारज्जू यांचे विकसं गर्भधारणा झाल्या झाल्या लगेच गर्भधारणेच्या सहा आठवड्यात सुरू होत असते.

हे अवयव तयार होण्यासाठी न्युरल ट्यूब वेळीच व्यवस्थित बंद व्हावी लागते. हे न झाल्यास बाळाचा मेंदू विकसित न होणे मजा रोजी किंवा मेंदूच्या इतर विकार होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या काही विकारांमध्ये बाळ जगू शकत नाही तर काही विकारांमुळे त्याला जन्मजात अपंगत्व ,मूत्र, विष्ठा बाहेर टाकण्याच्या क्रियेवर नियंत्रण नसणे अशा गंभीर विकृती होऊ शकतात.

अशा विकृती होण्यामागे एक कारण फॉलिक ऍसिड ची कमतरता हे असतील. होली के सी च्या गोळ्या ची गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासून सेवन केल्यास या विकृतीचे प्रमाण जवळपास 70 टक्‍क्‍यांनी कमी होते असे संशोधनातून आढळून आले आहे. 

यासाठी प्रत्येक जननक्षम महिलेने गर्भधारणापूर्व वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा प्रत्येक गर्भधारणेची योग्य नियोजन करायला हवे. गर्भधारणा हवी असलेल्या महिलेने पोरीच्या ची गोळी रोज घ्यायला हवी. या गोळीला कोणतेही अनिष्ट परिणाम नसतात. सर्वसाधारण स्त्रियांना रोज 400 मायक्रोग्रम इतकी मात्र पुरेशी असते. ही मात्रा आई एफ ये गोळीतून देखील मिळते.

शिवाय आहारामध्ये भाज्या व फळे यांचा समावेश करावा. असे केल्याने मज्जासंस्थेच्या विकृती टाळण्यास मदत होतेच. शिवाय इतरही विकृतीचे प्रमाण कमी होते. शिवाय मातेस ॲनिमिया होण्याची शक्यता कमी होते.

काही स्त्रियांच्या बालकांना या विकृती होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा अधिक असते उदाहरणार्थ.

• आधीच्या बाळंतपणात अशा विकृती असलेल्या बाळाचा जन्म झालेल्या असलेल्या स्त्रिया.

• मधुमेही किंवा अतिलठ्ठ स्त्रिया.

• फिट्स विकारा वरील औषधे घेणाऱ्या स्त्रिया.

• कुटुंबांमध्ये अशा विकृत बालकांचा जन्म झालेले असल्यास.


अशा स्त्रिया तर या बाबतील अधिक दक्ष राहायला हवे. त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भधारणेपूर्वी अधिक काळजी घ्यायला हवी. अशा स्त्रियांना फॉलिक ऍसिड ची 5 मिलीग्राम ची गोळी गर्भधारणेपूर्वी तीन महिने सुरू करायला सांगितले जाते.

मुख्य पान



 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying