६. किशोरवयीन वयामध्ये गर्भधारणा टाळणे | विवाह पूर्व गर्भधारणा | गर्भपातानंतर पुढच्या गर्भधारणेची नियोजन

किशोर वयामध्ये गर्भधारणा टाळणे

किशोर वयामध्ये गर्भधारणा टाळणे


आपल्या समाजात अजूनही लहान वयात मुलीचे लग्न केले जातात. लग्नाच्या वयाचा कायदा माहित असूनही मुली वयात आल्या की लगेच त्याच्या लग्नाची तयारी सुरू होते.

वीसपेक्षा कमी वयात गर्भधारणा राहणेही स्त्रीचा तसेच तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी हिताचे नसते. किशोर वय मुलीचे वाढीचे वय असते. तिची स्वतःची अन्नपदार्थाची गरज वाढलेली असते. या काळात ती गर्भवती झाल्यास तिची ही गरज आणखीनच वाढते.

शिवाय किशोरवयीन मुलींच्या कटिबंधात झाडाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळंतपणासाठी तिच्या शरीराची तयारी झालेली नसते. याचा परिणाम श्रीच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्यास होतो.

विवाह पूर्व गर्भधारणा


काही वेळेस विवाहपूर्व मुलीच गर्भधारणा राहते. अशा मुलीला प्रसूतीपूर्व काळजी मिळण्यासाठी शक्यता कमी असते. तिला गर्भपात करण्यामध्ये काही अडचणी आल्यास व सुरक्षित पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला जातो.

शालेय शिक्षण थांबते. एकंदरीतच या व्यक्तिमत्व विकासाला खीळ बसते. ती घरगुती हिंसाचाराचे शिकार बनण्याची शक्यता असते. विवाह पूर्व गर्भधारणा बऱ्याच वेळा जबरी लैंगिक संबंधामुळे होते तर काही वेळा मुलीला प्रजनन संस्थेचे कार्याबद्दल काहीच माहिती नसल्याने देखील होते.

अशी विवाहपूर्व गर्भधारणा टाळण्यासाठी पंधरा वर्षावरील सर्व मुलींना अंगणवाडी शाळा यामधून प्रजनन संख्येच्या कार्याविषयी जाणीव करून देण्याची गरज आहे.
याविषयी जागरुकता निर्माण करायला हवी.


किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणेची समस्या कमी करण्यासाठी काय उपाय योजना.


मासिक पाळी सुरू झालेल्या सर्व किशोरवयीन मुलींना एकत्रित करून प्रजनन संस्था व तिचे कार्य मासिक पाळी गर्भधारणा कुटुंब नियोजन सुरक्षित गर्भपात या विषयी माहिती द्यायला हवी. गर्भधारणा राहू नये यासाठी करावयाचे उपाय व पद्धती या पद्धती कुठे उपलब्ध आहेत याविषयी संवेदनशीलता जपून माहिती घ्यावी.

कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी या सर्व विषयी माहिती द्यावी.

मुली आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये मुलींचे शिक्षण कौशल्य वरदान स्वावलंबी त्व याबद्दल जागृकता निर्माण करून मुलीचे लग्न वयाच्या 18 वर्षानंतर  करावे.

कमी वयात लग्न झालेल्या किशोरवयीन मुलींना त्यांच्या पतीसमवेत भेटून लहान वयातील गर्भधारणेची धोके समजावून सांगावेत आणि वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत कुटुंबनियोजनाचा साधनाचा वापर करून गर्भधारणा टाळण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे.

परिचारिकेने अशा जोडप्यांचे विशेष समुपदेशन करून त्यांना योग्य त्या पद्धतीची निवड करण्यास मदत करावी व त्या पद्धतीचा वापर करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी.

गर्भपातानंतर पुढच्या गर्भधारणेची नियोजन


गर्भपातानंतर स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया लगेच दोन आठवड्यात सुरू होते.

गर्भपातानंतर सहा महिन्यात पुढची गर्भधारणा झाल्यास मातेच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी गर्भपातानंतर किमान सहा महिने कुटुंब नियोजनाच्या पद्धती चा वापर करून दिवस राहू देऊ नयेत.

अपत्य जन्मानंतर पुढच्या गर्भधारणेची नियोजन


मातेच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी दोन मुलांमध्ये किमान तीन ते पाच वर्ष अंतर असावे. म्हणजेच प्रसूतीनंतर पुढची गर्भधारणा किमान तीन वर्षे टाळता हवी.

याउलट लघुपट राहिलेल्या गर्भधारणेमुळे मुदतपूर्व प्रसूती किंवा बाळाची योग्य वाढ न झाल्यामुळे अशक्त कमी वजनाचे बाळ होण्याची शक्यता वाढते.

प्रसूतीनंतर साधारणतः  सहा आठवड्यांनी पुढची गर्भधारणा राहू शकते यासाठी प्रभावी कुटुंबनियोजन पद्धतीचा वापर प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनी निश्चितच सुरू करायला हवा.

मुख्य पान
 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying