नासुर म्हणजे काय ?

 नासुर म्हणजे काय ?

 खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल असा शब्द म्हणजे नासुर, काही जणांना हा शब्द अस वेगळा वाटतो की त्याला प्रश्न पडतो नासुर म्हणजे काय तर मित्रानो आज आपण बघणार आहोत नासुर म्हणजे काय तर चला बघूया....

नासुर म्हणजे काय ?


जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेस काही वेळा डॉक्टर रुग्णाचे निदान नासुर आहे असं म्हणतात, त्याचे ऑपरेशन करावे लागतात, किंवा काही वेळा नासुर साठी औषधी सुद्धा लिहून देतात.

नासुर हा एक डोळ्याचा आजार आहे त्यामध्ये रुग्णाच्या डोळ्यामधील नलिका मध्ये बंद झाल्यामुळे घशात पाणी न जाता डोळ्यात पाणी येते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होतो आणि त्यालाच आपण नासुर असे म्हणतो.याला आपण इंग्लिश मध्ये Dacryocystities असे म्हणतो.

नासुर चे काय लक्षणं असतात ?

नासुर म्हणजे काय ?


१. नासुर चे महत्वाचे लक्षण म्हणजे डोळ्यातून पाणी वाहने .

२. कधी कधी नाकाच्या बाजूला दाबल्यावर डोळ्याच्या punctum  नावाच्या भागातून पु येतो.

३. काही वेळा नाकाच्या बाजूला नासुर झाल्यामुळे खूप सूज येते.

४. डोळ्याला सुज आल्यामुळे डोळा खूप ठणकत असतो.


नासुरचे निदान कसे करतात ?


 नासुरचे निदान करावयाचे असल्यास आपण बघावे की 

डोळ्यात नेहमी पाणी येते का ?

नाकाच्या बाजूला दाबल्यास पु येतो का ?

नाकाच्या बाजूला सूज आहे का ?

असे लक्षणे असल्यास त्वरित डोळ्याच्या डॉक्टर शी संपर्क करावा.

डॉक्टर Sac Syriging  नावाची तपासणी करतात आणि त्या तपासणी मध्ये नासुर चे निदान करता येते.


नासुर आजारासाठी काय उपाय असतात ?


 डॉक्टर नासुरचे तपासणी करून तुम्हाला नासुरचे निदान करतात आणि उपचारामध्ये ........

१. अँटिबायोटिक्स डोळ्याचे ड्रॉप देतात

२. ठणकेसाठी काही वेदनांनाशक औषधी देखील देतात

३. नासुर शस्त्रक्रिया करावी लागेलं असें सुचवतात


नासुर शस्त्रक्रियेचे किती प्रकार असतात ?


नासुर शस्त्रक्रियेचे दोन प्रकार असतात . यामध्ये DCR आणि DCT नावाचे दोन प्रकारचे ओपेशन असतात. आपण बघुयात की काय फरक आहे या दोघांमध्ये 


DCR


म्हणजे Dacryocystorhinostomy हे ओपेशन नाकातून दुर्बिणीद्वारे केले जाते.

या ओपेशन मध्ये कान नाक आणि घश्याचे डॉक्टरांची मदद लागते करण हे ओपेशन नाकातून दुर्बिणीद्वारे केले जाते.

या शत्रक्रियेमध्ये नाकातून बंद असलेली डोळ्याची नलिका उघडली जाते आणि नासुर चा उपचार करण्यात येतो.

यामध्ये रुग्णाला लोकल भूल दिली जाते जे ने करून रुग्णाला त्रास होऊ नये.


DCT   


म्हणजे DACRYOCYSTECTOMY या मध्ये नाकाच्या बाजूला चिर देऊन नलिका उघडली जाते.

या मध्ये सुद्धा लोकल भूल दिली जाते 

पण DCT मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्यातून पाणी चालूच असते त्यामुळे ही शास्त्रकीया खूप वेळ करत नाही. पण काही वेळेस काही रुग्णाला फक्त हीच शस्त्रक्रिया करावी लागते उदा. ज्या रुग्णामध्ये अचानक नासुर होऊन खूप सूज अली असल्या वेळेस आपल्याला DCT करावे लागते.


OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Post a Comment

0 Comments