गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्ग स्पर्धा परीक्षा २०२५
महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक १८ सप्टेंबर, २०२५ ते २९ सप्टेंबर, २०२५ या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.
परीक्षार्थीना परीक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ यावावतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करुन देण्यात येईल. सदरचे प्रवेशपत्र परीक्षार्थीच्या लॉगीन आयडीवर, लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच परीक्षार्थींना एस.एम.एस व ई. मेलव्दारे ही कळविण्यात येईल.