उष्णतेला हरवा या गोष्टींचा अवलंब करा...

उष्णतेला हरवा या गोष्टींचा अवलंब करा...

• पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसताना देखील पाणी प्यावे.

• घरून आणलेले ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचे रस असे द्रव्य पदार्थ घ्या

• डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी

• दुपारी 12 ते 3 या वेळात घरात राहावे

• थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला/उन्हाला अडवावे

• प्रवासावेळी पाण्याची बाटली जवळ बाळगा

• पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे / भाज्या आहारात ठेवावी

• कलिंगड, खरबूज, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी आहारात ठेवावी चप्पल/बूट घालूनच घराबाहेर पडा

• हलक्या रंगाचे, पातळ सैल, सुती कपडे परिधान करावे

• स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी रेडिओ ऐका, टीव्ही बघा व वृत्तपत्राचे वाचन करा

• घराबाहेर जाणार असाल तर तुमची कामे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी ठेवावी

• दिवसा घरातील खिडक्या बंद ठेवून पडदेही सारावेत, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश घरामध्ये येणार नाही 

• रात्रीच्या वेळी खिडक्या उघडाव्यात, जेणेकरुन गार हवा आतमध्ये येऊ शकेल

उष्णतेला हरवा या गोष्टींचा अवलंब करा...


Post a Comment

0 Comments