आरोग्य विभागाअंतर्गत गट क व गट संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 विषयीचे महत्त्वाचे अपडेट

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालया यांच्या अखत्यारीतील गट क व गट संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 विषयीचे महत्त्वाचे अपडेट.

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालया यांच्या अखत्यारीतील गट क व गट संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 विषयीचे महत्त्वाचे अपडेट.चुकीचे प्रश्न / प्रश्नाचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान संबंधित प्राप्त आक्षेप /हरकती करिता शुल्क आकारणी

• आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा 2023 राज्यातील एकूण 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रामध्ये दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. 
• परीक्षा झाल्यानंतर टीसीएस यांच्याकडून दिनांक 15/12/2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका व अपेक्षित असलेले उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
• त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेला उत्तर पत्रिका  चुकीचे प्रश्न /प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर अक्षप नोंदविण्यासाठी दिनांक 18/12/2023 ते दिनांक 20/12/2023 या कालावधीतील टीसीएस कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. 
• सादर केलेला अक्षय हरकतीबाबत टीसीएस चे प्रश्न उत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 
• टीसीएस कंपनीकडून अक्षप सादर करण्यासाठी प्रति अक्षप करिता शंभर रुपये प्रमाणे फी आकारण्यात येते. 
• अक्षप किंवा हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते.

Post a Comment

0 Comments