डोळ्यामध्ये रक्त साकळणे किंवा उतरणे म्हणजे काय

डोळ्यामध्ये रक्त साकळणे किंवा उतरणे यालाच आपण इंग्लिश मध्ये (Subconjunctival Haemorrhage) किंवा SBH असे म्हणतो. डोळ्यामध्ये रक्त साकळणे किंवा उतरणे याला महत्त्वाचे कारण म्हणजे जोऱ्याने खोकला करणे किंवा शिंकणे, डोळ्याला मार लागणे, डोळा जोरात चोळणे, किंवा बीपी असलेल्या पेशंट मध्ये खूप साधारणतः असे लक्षणे दिसून येतात. आपण आजच्या या लेखांमध्ये डोळ्यात रक्त साकळणे किंवा उतरणे याविषयीची माहिती बघणार आहोत.


👉 ग्रुपमध्ये सामील व्हा👈

डोळ्यामध्ये रक्त साकळणे किंवा उतरणे म्हणजे काय



डोळ्यांमध्ये रक्त साकळणे किंवा उतरणे म्हणजे काय ?

डोळ्याला मार लागून किंवा जोऱ्याने खोकला किंवा शिंकल्याने डोळ्यामधील रक्तवाहिनी फुटते आणि त्यामुळे डोळा भडक लाल होतो. यामध्ये काही वेळा डोळा हा अर्धा लाल होतो तर काही वेळा पूर्णतः लाल होतो. डोळ्यांमध्ये रक्त साकळणे हा आजार खूप साधारणतः आढळून येणार आहे आणि त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे मार लागणे हे असते. यामध्ये साधारणता डोळ्यामध्ये असणारा Conjunctiva या भागाखाली रक्तवाहिनी फुटल्याने डोळा लालसर दिसतो.

डोळ्यामध्ये रक्त साकळणे यासाठी कोणकोणते कारण कारणीभूत ठरतात ? 

डोळ्यामध्ये रक्त साकळणे यासाठी बरेचसे कारणे कारणे व ठरत असतात पण त्यामध्ये खूप साधारणपणे आढळून येणारी काही कारण प्रमाणे आपण बघूया...
1. डोळ्याला मार लागणे
2. जोराने खोकला करणे
3. खूप जोरात शिंकने
4. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या काही रुग्णांमध्ये ही आढळून येते
5. उच्च रक्तदाब चा त्रास असणे

वरील प्रमाणे दर्शविलेल्या काही कारणामुळे डोळ्यांमध्ये रक्त उतरत असते.

डोळ्यात रक्त उतरण्याची चिन्हे कोणती ?

डोळ्यात रक्त उतरण्याची किंवा साकळण्याची चिन्हे यामध्ये डोळा हा भडक लाल दिसतो यामध्ये अर्धा डोळा तर कधी कधी पूर्ण डोळ्यांमध्ये ही लाली असते. दिलेल्या चित्रात तुम्ही बघू शकता की डोळ्यांमध्ये संपूर्णतः रक्त साकळलेले तुम्हाला दिसून येते. यामध्ये रुग्णाला दुसरा काही त्रास नसतो फक्त डोळ्यांमध्ये लाली ही खूप जास्त प्रमाणात दिसत असते.

काही वेळा डोळ्याच्या पाठीमागील पडद्याची देखील नस फुटू शकते परंतु त्यावेळेस गंभीर लक्षणे होऊ शकतात जसे की डोळ्याच्या पाठीमागील पडद्याची नस कुठली गेली तर त्यामुळे अचानक नजर कमी होते अशा वेळेस त्वरित नेत्र तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते.

डोळ्यामध्ये रक्त साकळणे यावर काय उपचार करायला हवेत ?

• डोळ्यामध्ये रक्त साकळणे असल्यास यावरती उपचारांमध्ये नेत्र तज्ञ तुम्हाला विटामिन सी युक्त गोळ्या देतील त्यामुळे डोळ्यातील लाली कमी होण्यास मदत होते.
• ज्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये रक्त साकळे आहे अशा व्यक्तीने अंबड पदार्थाचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावे त्यामुळेही डोळ्यातली लाली बरी होण्यास मदत मिळत असते.
• डोळ्यामध्ये एकदा साखळी किती कमी होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागत असतो.
• यामध्ये प्रतिरोधक उपायांमध्ये तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही उच्च रक्तदाबावरती व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत.

डोळ्यामध्ये रक्त उतरू नये यासाठी काय उपाय करायला हवेत ?

डोळ्यामध्ये रक्त साकळू नये तसेच उतरू नये यासाठी आपण डोळ्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. डोळा हा मानवी शरीराचा अत्यंत नाजूक आणि खूप महत्त्वाचा अवयव आहे. 

डोळ्याला थोडाही जोरात मार लागला किंवा धारदार वस्तू ने स्पर्श झाला तर त्यामुळे डोळ्याला दुखापत होऊन डोळ्यांमध्ये रक्त साकळण्याची संभावना जास्त असते त्यामुळे कामाच्या ठिकाणी डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

डोळ्यामध्ये जर अचानक कचरा गेला तर डोळा जास्त चोळल्यामुळेही डोळ्यांमध्ये रक्त सापडू शकते किंवा उतरू शकते.

डोळ्याला गाडी चालवताना किंवा कामाच्या ठिकाणी चष्म्याचा किंवा गॉगल चा वापर करावा जेणेकरून कोणतीही धारदार वस्तू डोळ्यापर्यंत जाणार नाही आणि डोळ्याला इजा होणार नाही.

डोळ्याला आपल्या हाताचे नख लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी कारण की धारदार नखाने ही बऱ्याच वेळा डोळ्यांमध्ये रक्त साकळण्याची घटना घडलेल्या आहेत.



आरोग्य विषयाची अशीच माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी खालील दिलेल्या ग्रुप वरती जॉईन व्हा

🔷 ग्रुपमध्ये सामील व्हा🔷

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying