डोळ्याची रचना आणि भाग

डोळ्याची (नेत्रगोलाची) रचना

आपल्या बुब्बुळ चा आकार हा संपूर्णपणे गोल नसून एक अंडकार आकार असतो. बुब्बुळ च्या आतील दाबामुळे डोळा हा भरीव आणि टनक दिसतो. डोळ्याच्या मधोमध असलेल्या बिंदूपासून डोळ्याचे दोन भाग पडतात त्याला आपण समोरील भाग ( Anterior pole )आणि पाठीमागील भाग ( Posterior pole ) असे म्हणत असतो. आणि दोन्ही भागामधील मधोमध असलेल्या भागाला आपण इक्वेटर (Equater) असे म्हणतो.बुब्बुळ चे आकारमान

आपण खालील प्रमाणे बघुयात की बुब्बुळ चे आकारमान हे किती असते.

• Anterior Posterior Diameter (समोरील भागापासून ते पाठीमागच्या भागापर्यंतचे लांबी ) 24 मिलिमीटर असतो

• Horizontal diameter ( बुब्बुळ ची आडवी लांबी ) 23.5 मिलिमीटर असतो.

• Verticle Diameter ( बुब्बुळ ची उभी लांबी )23 मिलिमीटर असतो.

• बुब्बुळ चा Circumference (परीघ) 75 मिलिमीटर असतो.

• बुब्बुळ चा Volume हा 6.5 मिली लिटर असतो.

• बुब्बुळ चे वजन 7 ग्राम असते.


नेत्रगोलाचे (बुब्बुळाचे ) भाग ( Coats of eyeball )

नेत्रगोलामध्ये तीन भाग आहेत त्यालाच आपण कोट (Coat ) असेही म्हणतो त्या भागांची माहिती आपण खालील प्रमाणे बघूयात.


1. Fibrous coat : 

• हे नेत्रगोलाचे बाहेरील आवरण असून याचे काम डोळ्याच्या आतील भागाचे संरक्षण करणे हे आहे.

• या कोट मध्ये किंवा या भागामध्ये कॉर्निया (Cornea) आणि स्क्लेरा (sclera) हे भागांचा समावेश असतो. 

• जिथे कॉर्निया (Cornea) आणि स्क्लेरा (sclera) एकत्र येतात त्याला limbus असे म्हणतात. 

• कॉर्नियाला आपण पारपटल असेही म्हणतो. कॉर्निया हा स्क्लेरा मध्ये अशा प्रकारे बसवला जातो जसे की घड्याळामध्ये काच बसवलेला असतो. 

• कॉर्निया हा नेत्रगोलाचा पारदर्शक भाग असतो.

• Sclera हा नेत्रगोलाचा पांढरा रंगाचा अपारदर्शक भाग असतो.


2. Vascular coat 

• या भागाचे काम म्हणजे नेत्रगोलातील वेगवेगळ्या भागांना पोषण तत्व पुरविणे हे आहे. 

• या भागामध्ये नेत्रगोलातील तीन भाग समाविष्ट केलेले आहेत त्यामध्ये Iris, Ciliary body, आणि Chorid यांचा समावेश आहे.

• हे डोळ्याच्या आत मधील आवरण आहे याचे काम हे डोळ्याला पोषण तत्व तसेच डोळा टणक ठेवण्यासाठी द्रव तयार करणे हे आहे. 

• त्या द्रवाला आपण Aqueous humor असे म्हणतो.


3. Nervous coat

• हे डोळ्याच्या सर्वात आतील आवरण असून या भागाचे काम म्हणजे बघितलेल्या वस्तूचे सिग्नल तयार करणे आणि डोळ्यापासून तयार झालेले सिग्नल हे मेंदूपर्यंत ऑप्टिक नर्व द्वारे पोहोचविण्याचे काम हे आवरण करत असते. 

• या भागामध्ये Retina, Vitreous humour, Optic nerve या भागाचा यामध्ये समावेश होतो.

• डोळ्यातील हा भाग अत्यंत नाजूक असतो.


डोळ्यातील सेगमेंट्स आणि चेंबर्स (Segments and Chembers)

नेत्रगोलाचे दोन सेगमेंट (segment) मध्ये विभाजन केलेले आहे.


1. Anterior Segment (समोरील सेगमेंट )


• डोळ्यातील लेन्सच्या समोरील भागास आपण Anterior Segment (समोरील सेगमेंट) असे म्हणतो.

• या सेगमेंटमध्ये लेन्सच्या समोरील म्हणजे Iris, Cornea, आणि दोन प्रकारचे चेंबर ( chamber) असतात.

• यामध्ये एन्टिरियर चेंबर आणि पोस्टरीवर चेंबर असे दोन चेंबर आहेत.

• हे दोन्हीही चेंबर सिलेरी बॉडी ( Ciliary Body ) पासून तयार झालेल्या द्रवाने म्हणजेच Aqueous Humour ने भरलेले असतात.


A) Anterior Chamber 

• एन्टिरियर चेंबर हे कॉर्नियाच्या ( Cornea ) मागील भागाने आणि iris आणि Ciliary body च्या समोरील भागाने तयार झालेली असते.

• साधारण व्यक्तीमध्ये Anterior chamber ची खोली ही 2.5 मिलिमीटर इतकी असते.

• Anterior chamber हे मायोपिया (Myopia) आजारामध्ये जास्त खोल असते तर हायपरमेट्रोपिया (Hypermetropia) या आजारामध्ये कमी खोल असते.

• दोन्ही डोळ्यातील एन्टिरियर चेंबर यांची खोली ही जवळपास सारखीच असते.

• एन्टिरियर चेंबर मधे जवळपास 0.25 मिलिलिटर Aqueous Humour असते.


B) Posterior Chamber 

• Posterior Chamber चा आकार हा त्रिकोणी सारखा असतो.

• Posterior Chamber हे iris व Ciliary body च्या मागील भागाने आणि लेन्स च्या समोरील भागाने तयार झालेले असते.

• यामध्ये जवळपास 0.06 मिली लिटर इतके Aqueous Humour असते.


2. Posterior Segment ( मागील सेगमेंट)

• डोळ्यातील लेन्सच्या (Lens) मागील भागास आपण पोस्टेरीवर सेगमेंट असे म्हणतो.

• या सेगमेंटमध्ये retina, Choroid, Optic Disc, आणि Vitreous humour या भागांचा समावेश होतो.


ज्ञानेश्वर भ. पोटफोडे

(नेत्रचिकित्सा अधिकारी)Post a Comment

0 Comments