Ticker

20/recent/ticker-posts

रांजणवाडी म्हणजे काय आणि त्यावर काही घरगुती उपाय कोणते ?

रांजणवाडी म्हणजे काय ?

रांजणवाडी हा खूप साधारणपणे आढळून येणारा डोळ्यांचा आजार आहे. या आजारांमध्ये साधारणतः लहान मुले आणि तरुण व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. staphylococcus नावाच्या बॅक्टेरिया चा जंतुसंसर्ग होऊन डोळ्याच्या पापणी वरती किंवा पापणीच्या कडेला पुळी तयार होते आणि त्यामुळे डोळ्याच्या पापणीला सूज येते, सूज आल्यामुळे डोळा ठणकतो दुखतो पाणी येते डोळ्याला लाली येते यालाच आपण रांजणवाडी झाले असे म्हणतो. 

राजनवाडी ला आपण hordeolum किंवा स्टाय असेही म्हणतो. 

राजनवाडी म्हणजे काय आणि त्यावरती काही घरगुती उपायरांजणवाडी चे प्रकार कोणते ?

रांजणवाडी चे दोन प्रकार असतात एका रांजणवाडी डोळ्याला त्रास होतो तर दुसऱ्यामध्ये डोळ्याला काहीही त्रास होत नाही.

जी रांजणवाडी पापणीच्या मधोमध येते तिला आपण chalazion म्हणतो. या प्रकारच्या राजनवाडी मध्ये रुग्णाला फारसा त्रास होत नाही.


जी रांजणवाडी पापणीच्या कडेला येते तिला आपण stye म्हणतो. या प्रकारच्या रांजणवाडीमध्ये रुग्णाला डोळ्याला सूज येऊन खूप त्रास होतो.


रांजणवाडी होण्याची कारणे कोणती ?

रांजणवाडी लहान मुलांमध्ये आणि तरुण व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येते रांजणवाडी होण्याची काही महत्त्वाचे कारणे खालील प्रमाणे नमूद केलेली आहेत ते आपण बघूयात...


1. डोळ्याला वारंवार चोळल्यामुळे किंवा हात लावल्यामुळे हातावरची घाण डोळ्याच्या पापण्याला लागून जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे रांजणवाडी होते.

2. खराब हात किंवा खराब कपडा चेहऱ्याला लावणे किंवा डोळ्याला लावणे त्यामुळे सुद्धा रांजणवाडी होते.

3. प्रदूषणाच्या ठिकाणी किंवा धुळेच्या ठिकाणी आणि जास्त उष्णतेच्या ठिकाणी काम करत असणाऱ्या व्यक्तीमध्ये रांजणवाडीचे प्रमाण अधिक जाणून येते कारण उष्णतेच्या ठिकाणी काम करताना डोळ्यातील अश्रू चे प्रमाण कमी होते त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ करणे असा त्रास होतो आणि त्यामुळे सुद्धा रांजणवाडी होते.

4. काही व्यक्तीला चष्म्याचा नंबर न लावल्यामुळे रांजणवाडी येऊ शकते. चष्म्याचा नंबर न लावल्यामुळे डोळ्यावरती ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे वाढवा डोळे चोळणे जळजळ करणे व्यवस्थित आराम न होणे त्यामुळे रांजणवाडी होते.

5. डोळ्याला व्यवस्थित आराम न भेटल्यामुळे जसे की जास्त वेळ संगणक किंवा मोबाईल बघितल्यामुळे किंवा रात्री झोप व्यवस्थित न झाल्यामुळे डोळ्याला व्यवस्थित आराम मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा रांजणवाडी होते.

6. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये वारंवार रांजणवाडी येऊ शकते.

7. जे व्यक्ती सिगारेट अल्कोहोल याची नशा करत असतील तर अशा व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते.


रांजणवाडी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी ?

रांजणवाडी हा खूप साधारणता आढळून येणारा आजार आहे हा आजार लहान मुलांमध्ये आणि तरुण व्यक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात जाणून येतो रांजणवाडी होऊ नये म्हणून आपण काही खालील प्रमाणे काळजी घ्यायला हवी ज्यामुळे रांजणवाडी येणे टाळता येईल...

1. डोळ्याला खराब कपडा किंवा खराब हात लावू नये.

2. वारंवार डोळ्याला हात लावणे किंवा चोळणे बंद करावे.

3. धुळे च्या ठिकाणी काम करत असताना डोळ्याला चष्मा लावणे किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा डोळे स्वच्छ धुणे.

4. गाडीवर प्रवास करत असताना डोळ्याला चष्मा लावणे.

5. डोळ्याला चष्मा लागला असेल तर व्यवस्थित चष्म्याचा नंबर लावणे तसेच नंबरची तपासणी प्रत्येक सहा महिन्याला करणे आवश्यक आहे.

6. रात्री वेळेवर झोपावे त्यामुळे डोळ्याला आराम होईल.

7. मोबाईल आणि संगणक यांचा वापर गरजेपुरताच करावा.

8. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये राहील असा आहार घ्यावा.

9. सिगारेट आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करावे

रांजणवाडी वर काय उपचार करावे ?

रांजणवाडीच्या उपचारांमध्ये महत्त्वाचे म्हणजे आपल्या सवयी जसे की वारंवार हात लावणे डोळ्यात चोळणे टाळल्याने रांजणवाडी वर बराचसा प्रतिबंध होतो.

रांजणवाडी आल्यानंतर गरम कपड्याने किंवा गरम पाण्याने शेक दिल्यानंतर पापणीला आलेली सूज आणि डोळ्याची ठणक बरी होते.

दोन ते तीन दिवसांमध्ये रांजणवाडी ही स्वतः कमी होते परंतु जर दोन ते तीन दिवसांमध्ये शेक दिल्यानंतरही कमी होत नसेल तर त्यासाठी नेत्र तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

नेत्र तज्ञ तुम्हाला काही अँटिबायोटिक्स ड्रॉप्स, पेन किलर आणि अँटिबायोटिक्स गोळ्या देतील त्यामुळे डोळ्याची सूज आणि रांजणवाडी कमी होईल.

जर औषध उपचार करूनही जर रांजणवाडी कमी होत नसेल तर त्यासाठी डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला देतील.

रांजणवाडी ची शस्त्रक्रिया ही काही अवघड बाब नाही. राजनवाडी ची शस्त्रक्रिया ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होते. यामध्ये नेत्रतज्ञ रांजणवाडी असलेल्या ठिकाणी चिरा देऊन रांजणवाडी मध्ये साचलेली पु बाहेर काढतील आणि त्यानंतर मात्र संपूर्ण रांजणवाडी ही बरी होईल.

काही व्यक्तींमध्ये राजनवाडीच्या वारंवार येण्याचे प्रमाण हे अधिक असते याला कारण असे की जर काही व्यक्तीला चष्म्याचा नंबर असतानाही व्यवस्थित डोळ्याची चष्मा न लावणे आणि वेळोवेळी डोळ्यांची तपासणी न करणे हे याचे प्रामुख्याचे कारण असायला हवे.

काही व्यक्तींमध्ये मधुमेहाचा त्रास असल्यामुळे ही वारंवार राजनवाडी येऊ शकते.


Post a Comment

0 Comments