अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत

अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत

अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत चे शासनाचे परिपत्रक दिनांक 11 सप्टेंबर 2014.


विहित पद्धतीने नियुक्त झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचार्‍यांच्या बाबतीत त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकार याने तो कर्मचारी विविध शर्तीनुसार पात्र होता त्याला स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

यासंबंधातील सूचना उपरोक्त संदर्भात शासन निर्णय परिपत्रक अन्वये देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या असे निदर्शनास येते की अशी प्रमाणपत्रे वेळच्यावेळी दिली जात नाहीत आणि दिल्या न गेल्यामुळे प्रमाणपत्राची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेतली जात नाही. त्यामुळे  प्रमाणपत्र मिळण्यास पात्र असूनही केवळ तसे प्रमाणपत्र दिले न गेल्यास कर्मचाऱ्यास अडचणी येतात तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे यासंबंधात मार्गदर्शन संदर्भ प्राप्त होतात.

त्यामुळे शासन निर्णय आणि परिपत्रकातील सूचना सर्व नियुक्ती प्राधिकारी यांच्या निदर्शनास आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे असे शासनाच्या परिपत्रक नमूद केले आहे.


शासन परिपत्रक:


प्रत्येक अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यास अधिकाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक आहे.

शासन निर्णय परिपत्रके अधिक्रमित करून त्यामधील सूचनांचा एकत्रित विचार करून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काही सूचना देण्यात आले आहेत.

1. प्रथम नियुक्तीच्या पदावर तीन वर्षाचे नियमित सेवा पूर्ण करणाऱ्या व पुढील शर्तीची पूर्तता करीत असलेल्या अस्थायी शासकीय कर्मचारी पैकी गट अ व गट ब अधिकाऱ्यांच्या बाबतीत संबंधित नियुक्ती प्राधिकार याने तसेच गट ब गट क आणि गट ड कर्मचार्‍यांच्या बाबतीत संबंधित कार्यालय प्रमुखाने स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहेत.

अ. कर्मचारी नियुक्ती सेवाप्रवेश नियमानुसार व विहित पद्धतीने होणे

ब. कर्मचारी सेवेत पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे व कर्मचाऱ्यांनी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे.

क. कर्मचार्‍याचा सेवा अभिलेख चांगला असणे आवश्यक आहे.

2. प्रत्येक पात्र अस्थायी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीने स्थायित्व प्रमाणपत्र परिशिष्ट अ नमुन्यात विनाविलंब देण्याची आणि त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्याची दक्षता संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

3. संबंधित कर्मचाऱ्याला तो स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिवसापासून पात्र ठरेल त्या दिवसात ते देण्यात यावे. एखाद्या कर्मचार्‍याच्या संबंधात स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला असेल तर त्याबाबत संबंधित कर्मचारी स्थायित्व प्रमाणपत्र न देण्यामागची कारणे नमूद करून कळविण्यात यावे व त्याबाबत त्या त्या वेळी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी.

4. ज्या प्रकरणांमध्ये स्थायित्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी जर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, बदली अथवा अन्यत्र सामावून घेण्याची कार्यवाही झाली असेल तर सदर कर्मचारी नियुक्ती पासून कार्यरत असलेल्या कार्यालयाकडून उपयुक्त सूचना अनुसार तीनही अटीची पूर्तता संबंधित कर्मचारी करीत होता किंवा कसे याबाबत ची माहिती त्याच्या सध्याच्या कार्यालयीन उपलब्ध करून घेऊन अशा कर्मचाऱ्यास तो पात्र ठरत असलेल्या पूर्वीच्या पदाचे स्थायित्व प्रमाणपत्र द्यावे.

5. वरील प्रमाणे स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम नियुक्तीच्या पदावर द्यावयाची असले आणि गट-अ पदावर कार्यरत शासकीय अधिकाऱ्यांना पूर्वी राजपत्रित पदावर काम करताना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असले तरी ते धारण करीत असलेल्या गटाच्या पदावर उपयुक्त सुचना नुसार तीनही अटीची पूर्तता करीत असल्यास त्यांना नव्याने स्थायित्व ला प्रमाणपत्र देण्यात यावे.

6. आपल्या कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या व तीन वर्षाचे नियमित सेवा पूर्ण करणाऱ्या पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक वर्षात दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत घ्यावा व या दिनांकापर्यंत स्थिती दर्शविणारा वार्षिक अहवाल त्याच वर्षी दिनांक 15 डिसेंबर पूर्वी तयार करावा.

सदर अहवालामध्ये संबंधित कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची संवर्ग निहाय एकूण संख्या त्यापैकी स्थायित्व प्रमाणपत्र धारकांची संख्या त्यापैकी सेवा पुस्तकात साहित्याची नोंद घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, पात्र असलेल्या तथापि स्थायित्व प्रमाणपत्र अद्याप न देण्यात आलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या, स्थायित्व साठी विचार करण्यात आलेल्या तथापि विहित अटीत पुरतं होत नसल्यामुळे स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती या मुद्द्यांची माहिती असावी.

7. सर्व मंत्रालयीन विभागांनी खूप विभागातील तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील नियुक्ती प्राधिकारी आणि कार्यालय प्रमुख यांच्याकडील अहवाल दिनांक 31 डिसेंबर पूर्वी संकलित करावेत व साहित्य प्रमाणपत्र देण्याबाबत याप्रकरणी निर्णय घेण्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी आणि कार्यालय प्रमुख यांच्याकडून कारण विलंब होणार नाही याकडे लक्ष पुरवावे.


पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचा नमुना.

अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत


Download Gr
Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying