डोळ्यात मोतीबिंदू तयार होण्याची लक्षणे कोणती आहेत ?

 डोळ्यात मोतीबिंदू तयार होणे म्हणजे काय ?

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यात असलेल्या पारदर्शक लेन्सचे अपारदर्शक होणे यालाच मोतीबिंदू म्हणतात. लेन्स अपारदर्शक होणे हे वयोमानानुसार, मार लागल्यामुळे steroid औषध घेतल्यामुळे, हानिकारक किरणांमुळे होते. काही वेळा मोतीबिंदू हा जन्मताच असू शकतो. 

डोळ्यात मोतीबिंदू तयार होण्याची लक्षणे कोणती आहेत ?


जसजशी मोतीबिंदूची सुरुवात होते त्या व्यक्तीला दिसायला अंधुक होते, सुरुवातीला नजरेमध्ये फारसा फरक जाणवत नाही पण जसजसा मोतिबिंदू वाढतो तशी नजर कमी होते.


डोळ्यात मोतीबिंदू तयार होण्याची लक्षणे कोणती आहेत ?


1. डोळ्यांची दृष्टी कमी होणे त्यामध्ये अंधुक अंधुक दिसायला लागते.

2. शक्यतो दूरचे दिसायला कमी होते.

3. मोतीबिंदू झाल्यानंतर काही वेळा कलर दिसण्यामध्ये तसेच कलर ओळखायला त्रास होतो.

4. मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीला गाडी चालविण्यास खूप लाइट चमकतो त्यालाच आपण Glare असे म्हणतो. रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना मोतीबिंदूच्या रुग्णांना खूप Glare दिसतात त्यामुळे असे रुग्ण गाडी चालू शकत नाही.

5. काही मोतीबिंदूच्या झालेल्या व्यक्तीमध्ये डबल दिसण्याचे त्रास असतो.

6. मोतीबिंदू मुळे गेलेली नजर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा वापरून सुद्धा वाढतं नसेल किंवा फारसा फरक पडत नसेल तर त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.

7. मोतीबिंदूचे लवकर निदान न झाल्यामुळे किंवा लवकर ऑपरेशन न केल्यामुळे काहीवेळा रुग्णाला फक्त लाईट दिसतो अशा पेशंटला आपण Hyper Mature Cataract असे संबोधतो.

मोतीबिंदू झालेल्या रुग्णांनी जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी किंवा नेत्ररोग तज्ञ यांचा सल्ला घ्यावा.

मोतीबिंदू मुळे गेलेली नजर परत आणता येते पण मोतीबिंदू जास्त होऊन त्याचे रूपांतर काचबिंदू मध्ये होत असते अशा वेळेस काचबिंदू मुळे गेलेली नजर परत आणता येत नसते त्यामुळे रुग्णांनी याची काळजी घ्यावी लवकरात लवकर नेत्र तज्ञ चा द्यायचा सल्ला घ्यावा.

मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काय करावे व काय करू नये ?



Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying