अचानक डोळ्याची नजर कमी होणे

 डोळ्याची अचानक नजर कमी का होते ?


डोळा हा शरीराचा खूप नाजूक अवयव आहे तसेच दिसण्याचे खूप मोलाचे काम करत असतो. डोळ्याची रचना ही खूप नाजूक असून खूप बारकाई ची आहे.

 तसेच दिसण्याचे संपूर्ण काम पाठीमागच्या पडद्यावरती असते जर अचानक पणे जर नजर कमी होत असेल तर खूप साधारणतः हेच कारण असेल की पाठीमागच्या पडद्यावरती बदल झालेला आहे, बदल मार लागून झाला असेल, पाठी मागच्या पडद्यावर सुज असेल अशा वेगवेगळ्या कारणांनी सुद्धा होऊ शकतो. 

डोळ्याची अचानक नजर कमी का होते ?


पाठी मागचा पडदा हा डोळ्याचा अतिशय नाजूक भाग असतो जर थोडा ही डोळ्याला मार लागला तर डोळ्याची नजर कमी होऊ शकते.


नजर कमी होण्याचे प्रकार ?


डोळ्यांची नजर कमी होणे हे एक खूप साधारण लक्षण आहे डोळ्याची नजर कमी होण्यामागे खूप वेगवेगळी कारणं असू शकतात.

नजर कमी होणे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे नजर कमी होऊ शकते जसे घेऊन दूरची दृष्टी कमी होणे ( Distance Vision) , जवळची दृष्टी कमी होणे (Near vision),  मध्य भागाची नजर कमी होणे ( Central Vision)  किंवा आजूबाजूची नजर कमी होणे (Peripheral Vision ).


अचानक नजर कमी होण्याची कारणे कोणती ?


अचानक एकदम नजर कमी होण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत यामध्ये काहीवेळा वेदना होऊन नजर कमी होते,  तर काही वेळा काहीही वेदना न होता अचानक नजर कमी होते, यामध्ये वेगवेगळे डोळ्याचे आजार ( Eye disease ) असू शकतात.


काहीवेळा अचानक पणे पण डोळ्याला काहीही त्रास न होता डोळ्याची संपूर्ण नजर कमी होते अशा प्रकारची लक्षणे साधारणतः पाठीमागच्या पडद्यामध्ये ( Retina)  आणि झालेल्या बदलामुळे होते.


1. डोळ्याला पाठीमागच्या पडद्याला पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे अचानक नजर कमी होऊ शकते.


  2. डोळ्याला मार लागून डोळ्याच्या विक्टरिअस (Vitreous) या भागांमध्ये रक्त जमा होते त्यामुळेसुद्धा काही त्रास न होता अचानक नजर कमी होते (Vitreous haemorrhage).


3. डोळ्याला जोरात मार लागला तर डोळ्याचा पाठीमागील पडदा फाटला जातो तो पाठीमागच्या भागाला चिटकलेला पडदा समोर येतो (Retinal detachment)  यामध्ये जर Macula नावाचा भाग एकत्रीत असेल तर अचानक पणे डोळ्याची संपूर्ण नजर जाऊ शकते.

4.  काचबिंदू (Acute Glaucoma )  झाला असेल त्यामुळेसुद्धा डोळ्याला खूप वेदना होऊन( Pain) डोळ्याची संपूर्ण नजर जाऊ शकते यामध्ये डोळ्यावर सूज येऊ शकते, डोळ्याचे प्रेशर वाढते (IOP: Intraocular pressure).


5. डोळ्यामध्ये कोणते प्रकारचे केमिकल इजा झाली असेल त्यामुळे सुद्धा पूर्णपणे नजर जाऊ शकते


6. डोळ्याला मार लागल्यामुळे सुद्धा अचानक पणे नजर जाते.


डोळ्याचे आजार आणि त्यामुळे नजरेवर होणारे परिणाम


आजूबाजूची नजर कमी होणे (Peripheral Vision) हे मुख्यतः काचबिंदू आजाराचे लक्षण असते तसेच मध्यम भागाची नजर कमी होणे ( Central vision) हे लक्षण (Retina) पाठीमागच्या पडद्याच्या मॅक्युला (Macula( या भागाला सुरू झाल्यामुळे किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे झाल्यामुळे होते.


यामध्ये जसे की डोळ्याचा नंबर असणे (Refractive error ), डोळ्याला मार लागून नजर कमी होणे (Traumatic eye ), काचबिंदू मुळे नजर कमी होणे (Glaucoma), मोतीबिंदू मुळे नजर कमी होते ( Cataract ), तसेच पाठीमागच्या पडद्याला (Retina ) सूज येऊन किंवा मार लागून सुद्धा नजर कमी होऊ शकते.


डोळ्याचे आजार आणि लक्षणे


नजर कमी होण्यासोबतच आणखीन वेगळी लक्षणे असू शकतात जसे की डोळा दुखणे ( Pain), डोळा लाल होणे (Redness), खाज येणे (Itching), सूज येणे ( Swelling ) अशा प्रकारची लक्षणे असू शकतात. एकत्रितपणे लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार डोळ्याच्या वेगवेगळ्या विकाराची निदान करता येते.


मोतिबिंदु शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी

Post a Comment

0 Comments