काचबिंदू एक घातक आजार

 काचबिंदू एक घातक आजार

काचबिंदू एक घातक आजार


असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी मित्रांनो सध्या काचबिंदू सप्ताह सुरु आहे. काचबिंदु म्हणजे काय व त्यावर उपाय काय याची माहीती आज आपण पाहणार आहोत.

 या संसारजगतात लोक एवढे मग्न झाले आहेत की कोणालाही आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की  शरीर आणि आरोग्य हिच खरी आपली संपत्ती आहे . कारण संसारातील सर्व वस्तु आपण पैसे देवुन खरीदी करु शकतो परंतु शरीर व शरीराचे अवयव हे कितीही पैसे देवुन खरेदी करु शकत नाही. म्हणुन प्रत्येकाने शरीराकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. मित्रांनो शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव हा डोळा आहे. कारण डोळे असेल तर सर्व दिसेल नाहीतर सर्व अंधार म्हणुन या अंधारातुन प्रकाशाकडे यायचे असेल तर डोळयाकडे दु‌र्लक्ष करुन चालणार नाही. आज आपण काचबिंदू या सप्ताहानिमीत्त काचबिंदू बद्दल माहिती पाहणार आहोत-

डोळयांच्या सर्व आजारामध्ये सर्वात खतरनाक,घातक आणि धोकादायक आजार कोणता असेल तर तो आहे काचबिंन्दु आहे. डोळयामधील दाब किंवा ताण वाढल्यामुळे काचबिंदु होतो. काचबिंदुचे दोन प्रकार आहेत. Open Angle Glaucoma हा लवकर लक्षात येत नाही परंतु Close Angle Glaucoma मुळे डोके दुखणे,अंधुक दिसणे,मळमळ उलटी होणे,डोळा लाल होणे इत्यादी त्रास होतो व पुर्णपणे दृष्टीही जावु शकते. त्यामुळे शरीरातील कोणत्याही घटकामुळे जर आपण परेशान असाल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. 

1-  आपले वय चाळीस वर्षापेक्षा जास्त आहे का ?

2- आपल्या कुटूंबात काचबिंदू किंवा आंधळेपणाचा काही इतिहास आहे का ?

3- आपल्या घरात कोणाला डायबिटीज किंवा थायराॅईडचा आजार आहे का ?

4- घरात कोणाला मोठ्या नंबरचा चष्मा आहे का ? 

5- मोठा नंबर कमी करण्यासाठी लॅसिक शस्त्रक्रिया केली आहे का ?

6- डोळयासमोर काही वलय दिसतात का,डोळयाला काही इजा,काही मार लागलेला आहे का ?

वरील पैकी कुठलाही घटक आपणामध्ये असेल तर डोळयाची तपासणी करणे आवश्यक आहे.

काचबिंदू असा आजार आहे की त्यावर कुठलाही रामबाण विलाज नाही. जसा मधुमेह पुर्णपणे बरा होत नाही परंतु औषधोपचाराने नियंत्रणात आणता येतो तसा काचबिंदु पण औषधोपचाराने नियंत्रणात ठेवता येतो. दुसरी गोष्ट अशी की घरात एखादयाला काचबिंदू असेल तर घरातील सर्वांची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण अनुवंशिकता हेपण काचबिंदूचे एक लक्षण मानले जाते. जर वेळीच काळजी घेतली तर आपण काचबिंदूपासुन बचाव करु शकतो. म्हणुन प्रत्येकाने वयाच्या चाळीशीनंतर सर्वांनी डोळयांची तपासणी करणे आवश्यक आहे.

आपल्याला काचबिंदू झाला असल्यास आपल्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना (सर्व वयाच्या) याची कल्पना द्यावी व त्यांना काचबिंदूच्या तपासण्या करून घेण्यास सांगावे. कारण काचबिंदू अनुवंशिक असतो व तो कोणत्याही वयात होऊ शकतो.

काचबिंदुच्या लवकर निदानामुळे आपण अंधत्वाचा धोका टाळू शकता आणि उत्तम आयुष्य जगू शकता

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying