डोळ्यामध्ये जळजळणे कारणे आणि उपाय Burning sensation In eye

 डोळा जळजळ करणे (Burning sensation In eye )

डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांमधील अश्रूंचे प्रमाण कमी होऊन कोरडेपणा होतो व त्यामुळेच डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला लागते.

डोळा जळजळ करणे कारणे आणि उपाय Burning sensation In eye


डोळ्यात जळजळ होणे हे खूप सार्‍या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने आढळून येते. डोळ्यात जळजळ होणे हे साधारणतः उन्हामध्ये काम केल्याने, डोळ्यात कोरडेपणा असल्यामुळे, धूळ धूर अशा ठिकाणी काम केल्यामुळे, मोबाईल टीव्ही आणि कॅम्पुटर जास्त वेळ बघितल्यामुळे डोळ्यामधील अश्रू कमी होऊन डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला लागते. डोळा जळजळणे यालाच आपण Burning Sensation असे म्हणतो.

याव्यतिरिक्त डोळ्यांमध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे सुद्धा जळजळ होऊ शकते.


डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची ही आहेत कारणे


डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांमधील अश्रूंचे प्रमाण कमी होऊन कोरडेपणा होतो व त्यामुळेच डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला लागते डोळ्यांमध्ये कोरडेपणा होण्यासाठी खालील पैकी कारणे असू शकतात.


• प्रखर उन्हामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती

• डोळ्याला जंतूसंसर्ग झाल्यामुळे

• डोळ्याला ॲलर्जी झाल्यामुळे

• डोळ्यावर आलेले अतिरिक्त ताणामुळे

• चष्म्याचा नंबर असल्यामुळे

• मोबाईलचा जास्त वापर असल्यामुळे

• कॅम्पुटर तसेच लॅपटॉप वरती जास्त वेळ काम केल्यामुळे

• धूळ धूर अशा ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये

• जास्त हवेच्या ठिकाणी काम करणाऱ्या किंवा ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये

• डोळ्यामध्ये साबण किंवा शाम्पू गेल्यामुळे ही जळजळ होते.

• डोळ्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ व्हायला लागते.

• चष्म्याचा नंबर बदललेला असल्यामुळे सुद्धा जळजळ होऊ शकते.

• पुरेशी झोप न झाल्यामुळे सुद्धा जळजळ होते.

• स्विमिंग पूल मध्ये पोहल्यामुळे सुद्धा डोळ्यांमध्ये जळजळ होते कारण की स्विमिंग पूल च्या पाण्यामध्ये क्लोरीन मिसळलेले असते

• पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा डोळ्यात गेल्यामुळे डोळ्या मध्ये जळजळ होते.


डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर असा करा घरगुती उपाय


डोळ्यांमध्ये नेहमी जळजळ होत असेल तर यामध्ये महत्त्वाचा उपाय म्हणजे बाहेरून आल्यावर दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवावे. त्यासोबतच खालील उपायांचा अवलंब करावा.


• दिवसातून तीन ते चार वेळा थंड आणि स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे.

• थंड काकडीची चकली 5  मिनिटे डोळ्यावरती ठेवावी.

• जळजळ करत असतील तर डोळ्यावरती थंड पाण्यामध्ये भिजवलेली पट्टी ठेवावे.

• ड्रायव्हिंग करत असताना डोळ्यावरती गॉगल्स वापरावा तसेच हेल्मेटचा वापर करावा.

• गरम वातावरणात काम करत असताना डोळ्यावरती  protective glasses वापरावे.

• मोबाईलचा वापर करत असताना जास्तीत जास्त वेळा डोळ्यांची उघडझाप करावी.

• कॅम्पुटर तसेच लॅपटॉप वरती काम करत असताना  दूर बघावे किंवा दुसरीकडे बघावे, मधोमध ब्रेक घ्यावा.

• डोळ्यांमध्ये ऍलर्जी झालेली असल्यास डॉक्टरांनी दिलेल्या औषधी सांगितल्याप्रमाणे वेळेवर टाकावी.

• डोळ्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे जर जळजळ होत असेल तर अशा वेळेस त्वरित जवळच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांना दाखवावे.


डोळ्याची जळजळ होऊ नये म्हणून अशी घ्यावी डोळ्यांची काळजी


स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुवावेत 

बाहेरून फिरून आल्यावर स्वच्छ व थंड पाण्याने डोळे धुतल्यामुळे डोळ्यात साचलेली धूळ निघून जाते व त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

तसेच दिवसातून तीन ते चार वेळा केल्यामुळे डोळ्यावरती जळजळ होण्यापासून चांगला परिणाम जाणवतो.


कम्प्युटर लॅपटॉप तसेच मोबाईल वापरताना अशी घ्यावी डोळ्याची काळजी

संगणक लॅपटॉप आणि मोबाईल यांच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यावरची खूप भयंकर परिणाम होत असतात. डिजिटल मीडियामुळे डोळ्यावरती झालेले परिणाम आपल्याला जा बघायला भेटतात.

मोबाईल मुळे डोळ्यावरती पडणाऱ्या घातक किरणांमुळे डोळ्यांमध्ये जळजळ करणे, डोळ्याला खाज येणे, पाणी येणे, डोळ्यामध्ये टोचल्यासारखे वाटणे असे परिणाम होतात.

मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा व तसेच त्यासोबत वापरताना मोबाईलचा उजेड कमी असावा, रात्री अंधरामध्ये मोबाईल वापरू नये.

संगणक लॅपटॉप वापरताना आधुनिक चष्मा वापरावा. त्यामुळे संगणका मधून निघणारे डोळा पर्यंत जाणार नाही मिळेल.


जर तुमच्या डोळ्याची जळजळ कमी होत नसेल त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.Post a Comment

0 Comments