राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केल्या जाणाऱ्या नेत्रशस्त्रक्रिया बाबत सूचना

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केल्या जाणाऱ्या नेत्रशस्त्रक्रिया बाबत घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन सूचना

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केल्या जाणाऱ्या नेत्रशस्त्रक्रिया बाबत घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन सूचना



राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केल्या जाणाऱ्या नेत्रशस्त्रक्रिया बाबत घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शन सूचना.

सामान्य सूचना ( General instructions )


1. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र नेत्रशस्त्रक्रिया गृह करावे व या शस्त्रक्रिया गृहामध्ये आवश्यक निर्जंतुकीकरण याची काळजी घेऊन शस्त्रक्रिया करण्यात याव्यात.

2. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये रुग्णाची फक्त तपासणी करण्यात यावी व त्याच्या शस्त्रक्रिया मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया गृह असणाऱ्या रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात याव्यात.

3. या रुग्णालयाच्या अंतर्मन विभागांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड, स्वतंत्र नेत्रशस्त्रक्रिया गृह उपलब्ध असून सदर नेत्रशस्त्रक्रिया गृह नियमितपणे चालू स्थितीत आहे व शस्त्रक्रिया गृह नेहमी योग्य निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येत आहे अशा रुग्णालयांना शिबिरे आयोजित करण्या करिता परवानगी देण्यात येईल. वजा रुग्णालयात सात दिवसापेक्षा जास्त दिवस शस्त्रक्रिया गृह बंद आहे अशा ठिकाणी नेत्र शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

4. शस्त्रक्रिया गृहामध्ये भिंतीवर कोणत्याही प्रकारचे फोटो, उदबत्ती, दिवा, आरसा, कॅलेंडर,नोटीस बोर्ड इत्यादी लावू नये.

5. नेत्र शस्त्रक्रिया विभागाच्या व शस्त्रक्रिया गृहाला पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या टाक्या नियमितपणे साफ करण्यात याव्यात.

6. नेत्रशस्त्रक्रिया गृहला पुरवठा होणाऱ्या पाण्याची सॅम्पल नियमित पाठविण्यात यावे व त्यांचे वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी.

7. एकच डोळा असणाऱ्या रुग्ण वर जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येऊ नये अशा रुग्णांना समुपदेशन करून जे जे रुग्णालय मुंबई येथे संदर्भित करण्यात यावे. न करता ती शस्त्रक्रिया नियोजित करण्यात यावी व वरिष्ठ नेत्रतज्ञ कडून करण्यात यावी.

8. नेत्र शस्त्रक्रिया पथकामध्ये आवश्यक अनुभव असलेले दोन नेत्र शल्य चिकित्सक, दोन स्टाफ नर्स, एक नेत्र चिकित्सा अधिकारी, एक शस्त्रक्रिया गृह सहायक असणे आवश्यक आहे.

9. नेत्र शस्त्रक्रिया पथका मधील वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक यांना शासकीय किंवा शासकीय क्षेत्रात किमान पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असावा किंवा Ophthalmology पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा घेतल्यानंतर किमान पाचशे शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र असावे. कोणत्याही परिस्थितीत कनिष्ठ नेत्रचिकित्सकआने स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करू नये.

10. नेत्र शस्त्रक्रिया साठी प्रत्येक नेत्रशल्यचिकित्साकाकडे चांगल्या दर्जाच्या व सुस्थितीत असलेल्या मायक्रोस्कोप असावा. नेत्र शस्त्रक्रिया करताना घाई करू नये.

11. दुसऱ्या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये मुख्य नेत्रशल्यचिकित्सा कडून एका दिवशी 25 नेत्रशस्त्रक्रिया पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात येऊ नयेत.

12. नेत्र शस्त्रक्रिया साठी वापरले जाणारे साहित्य सामग्री यांचे निर्जंतुकीकरण इतर विभागातील साहित्यांच्या निर्जंतुकीकरण हा बरोबर करण्यात येऊ नये त्यासाठी वेगळे अटॉक्लावे वापरण्यात यावे. तथापि जर वेगळ्या  मशीन उपलब्ध नसेल तर शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्जंतुकीकरण  करण्याची वेळ निश्चित करावी. नेत्र शल्यचिकित्सक यांनी शस्त्रक्रिया पूर्वी सर्व साहित्य योग्य प्रकारे ऑटॉकलेव झाले आहेत याची खात्री करावी याची संपूर्ण जबाबदारी नेत्रशस्त्रक्रिया परिचारिका व नंतर शल्यचिकित्सक यांची राहील.

13. शस्त्रक्रिया गृहाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर महिन्यातून किमान एकदा एअर सेटल प्लेट (Air Settle plate ) घेऊन किंवा सही घेऊन शस्त्रक्रिया गृह जंतू आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात यावी.

14. हत्यारे, लीनेन , शस्त्रक्रिया साठी लागणाऱ्या सर्व सामग्री चे निर्जंतुकीकरण केल्यानंतर वरील साहित्य 12 तासाच्या आत वापरण्यात यावी. बारा तासानंतर या साहित्याची शस्त्रक्रियेसाठी वापरण्याची गरज पडल्यास ते पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात यावे व नंतरच ते वापरण्यात यावेत.

15. मोतीबिंदू शस्त्रक्रिया रेकॉर्डमध्ये प्रत्येक रुग्णाचे फोटो , ओळखपत्र, पत्ता , संपर्क क्रमांक नमूद करून जतन करण्यात यावा जेणेकरून गरज पडल्यास लवकर संपर्क करणे सोयीचे होईल.

शस्त्रक्रिया पूर्वसूचना ( pre-operative )


16. मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची शस्त्रक्रिया साठी योग्यता पाहण्यासाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.

17. नेत्र शस्त्रक्रिया गृहातील मायक्रोस्कोप, सर्जिकल ट्रॉली,  रुग्णाचे व शस्त्रक्रिया पथकाकडून वापरण्यात येणारी कपडे, शस्त्रक्रिया करिता वापरण्यात येणारे सर्व साहित्य, इंटर ऑपरेटिव सर्जिकल, विस्को, आय ओ एल, इ. साहित्य पूर्णपणे निर्जंतुक असल्याची खात्री करावी कोणत्याही परिस्थितीत असिटोन सारखे कमी दर्जाचे निर्जंतुकीकरण साहित्य वापरण्यात येऊ नये.

18. मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया करिता निवडण्यात आलेल्या रुग्णांना प्रतिजैविके आय ड्रॉप उपचाराच्या गरजेनुसार डोळ्यात टाकण्यासाठी देण्यात यावी.

शस्त्रक्रियेदरम्यान च्या सूचना (Intra-Operative)


19. शस्त्रक्रिया पथकाने प्रत्येक रुग्णासाठी वेगळा  cataract surgery set वापरावा व त्यांचे योग्य निर्जंतुकीकरण झाले असल्याची खात्री करावी. नेत्र शल्यचिकित्सकांनी रुग्णाच्या संख्येप्रमाणे पुरेशा प्रमाणात कॅटारॅक्ट सर्जरी सेट ( Cataract surgery set ) उपलब्ध असल्याची खात्री ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी करावी.

20. निर्जंतुकीकरण करत असताना मोतीबिंदू चे सर्व साहित्य एकत्र करून निर्जंतुकीकरण न करता प्रत्येक शेट वेगळा करून त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. निर्जंतुकीकरण करत असताना या सेट च्या वर व आत दोन ठिकाणी इंडिकेटर टेप लावण्या लावावा. स्त्रिपवर दिनांक वेळ व कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी असावी प्रत्येक सेट स्वतंत्रपणे गुंडाळावे.

21. कोणतेही परिस्थितित मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी लागणारे साहित्य व पाण्यात उकळून केमिकल वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येऊ नये असे आढळल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्स यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल..

22. शस्त्रक्रिया गृहात चितळ फॉर्सप याचा वापर हत्यारे लिहिण्यासाठी किंवा लिहून देण्यासाठी तथा इतर गोष्टीसाठी करण्यात येऊ नये.

23. हात धुण्यासाठी लिक्विड सोप वापरण्यात यावा साबणाची वडी व सोपे केस वापरण्यात येऊ नये.

24. शस्त्रक्रिया गृहातील भिंग स्टिकर नोंदवही तसा स्टिकर रुग्णाच्या डिस्चार्ज कार्ड व केस पेपर वर लावण्यात यावा. निर्जंतुकीकरण रजिस्टर फॅब्रिकेशन रजिस्टर मायक्रोबायोलॉजी करून आलेले स्वाब रिपोर्ट जोडावेत. व शासकीय नोंदवही ठेवण्यात यावी व यावर रोजच्या रोज परी सेविका व नेत्रशल्यचिकित्सा करणे स्वाक्षरी करावी.

25. शस्त्रक्रिया करत असताना प्राधान्याने सर्जिकल ग्रेप्स चा उपयोग करावा त्यामुळे त्वचेवर व डोळ्याचे आजूबाजूला लागणारे जंतू हाताला किंवा हा त्याला लागून डोळ्यात जाणार नाहीत तसेच वापरलेले पाणी किंवा सलाईन वनौषधी जमिनीवर पडून ओली होणार नाही.

26. एका OT मध्ये जर जास्त शस्त्रक्रिया होणार असल्यास आठ तासानंतर दोन तासाचा खंड देऊन त्या दरम्यान किंवा बसिलोसिड स्प्रे यांनी fumigation करण्यात यावे व दोन तास OT बंद ठेवावी त्यानंतर उर्वरित ऑपरेशन करावे.

27. नेत्र शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाच्या डोळ्यावर योग्य पद्धतीने आयपॅड बांधणे आवश्यक आहे.

28. प्रत्येक रुग्णाला निर्जंतुकीकरण केलेल्या वेगळा सेट व वेगळे डिस्पोजेबल सिरिन, सर्जिकल द्रेपस इत्यादी वापरण्यात यावी.

29. शासकीय पूर्व शिबिरामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्य सामग्रीची पुरवठा कंपनी, मुदत समाप्ती, पॅकिंग व स्वच्छता अशी तपासणी करणे आवश्यक आहे. वास बॉटल हलवून त्यामध्ये काही अशुद्धता आहे का हे पाहण्याची अचूक निरीक्षण करणे गरजेचे आहे.

शस्त्रक्रिया पश्चात सूचना (post operative ).


30. नेत्रशस्त्रक्रिया पश्चात होणारे संसर्ग व इतर कोणता कोणता टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णास नेत्रशस्त्रक्रिया पश्चात देण्यात येणारे योग्य उपचार करण्यात यावेत.

31. पूर्ण दृष्टी परत मिळविण्याकरिता भविष्यात पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

32. नेत्र शल्यचिकित्सकाने त्यांचा पथकासोबत प्रत्येक रुग्णाची नेत्र शस्त्रक्रिया पश्चात पहिल्या, तिसर्‍या व सातव्या दिवशी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

33. शस्त्रक्रियेच्या सातव्या दिवशी मात्र शल्यचिकित्सकांनी रुग्णास स्वतः तपासून दृष्टीला किती झाला याची नोंद करण्यात यावी. तसेच 35 ते 40 दिवसात या रोगाला पुन्हा तपासून चष्म्याचा नंबर काढावेत पुढील पंधरा दिवसात त्यांना चष्मे द्यावे.

34. एका रुग्णास जरी त्रास झाला असेल तरी त्या दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांचा एक महिना पाठपुरावा करावा.

35. दोन पेक्षा जास्त रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्याबरोबर बारा तासाच्या आत तज्ञांना पाचारण करण्यात येऊन वरिष्ठांना कळविण्यात यावे. विलंबाने कळविल्यास अधिकाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल.

36. दोन पेक्षा जास्त लोकांना जंतुसंसर्ग झाल्याचे दिसून येताच शस्त्रक्रिया गृह यंत्रे हत्यारे लिहिणं औषधी इत्यादीचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते पाठविण्यात यावे व जंतुसंसर्गाची कारणे शोधण्याची जबाबदारी शस्त्रक्रिया करणाऱ्या ने तर त्यांना देण्यात यावी.



अशासकीय स्वयंसेवी संस्था करिता सूचना


37. जसं की स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत आहेत अशा संस्थांना शिबिरे घेणे करिता त्यांच्या पूर्व इतिहासाची शहानिशा केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात यावी.

38. अशासकीय स्वयंसेवी संस्था यांनी प्रस्तावित केलेले नेत्र शस्त्रक्रिया गृह व त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे मुल्यांकन केल्यानंतर शिबिर आयोजित करण्यास परवानगी देण्यात यावी.

39. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अशासकीय संस्था व खाजगी रुग्णालये यांनी जिल्हा स्तरावरील अधिकारी सोबत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार करारनामा करणे आवश्यक आहे.

उपयुक्त मार्गदर्शन सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी अधिकारी-कर्मचारी सूचनांची दखल घेणार नाहीत व कर्तव्यावर निष्काळजीपणा करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

मार्गदर्शक सूचना चे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Post a Comment

0 Comments