ब - प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा

प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा

प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा


माता मृत्यू ची कारणे:
  • गरोदरपणी किंवा प्रसुतीनंतर अति रक्तस्त्राव होणे
  • उच्चरक्तदाबामुळे होणाऱ्या गुंतागुंती, झटके येणे
  • जंतूसंसर्ग होणे

नवजात अर्भक मृत्यू ची कारणे:

  • नवजात बालकांच्या मृत्यूचे सर्वात महत्वाचे कारण अपुऱ्या दिवसाची प्रसूती आणि गर्भाशयात गर्भाची वाढ खुंटणे. या दोन्हीमुळे कमी वजनाचे आणि अशक्त बाळ जन्माला येते. अशा बाळांना श्वास घ्यायला त्रास, जंतुसंसर्ग, रक्तातील साखर कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे यासारख्या गुंतागुंती होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • नवजात अर्भकाला जंतुसंसर्ग होऊन त्यामुळेही अर्भकमृत्यू होण्याची शक्यता असते. 
  • बाळंतपणामध्ये बाळाला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे बाळ जन्मतःच गुदमरलेले असणे हेही एक नवजात बालकांच्या मृत्यूचे कारण आहे. (Birth asphyxia) |
  •  शारीरिक व्यंग

नवजात अर्भकांचे मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना:

यासाठी जन्मतःच कमी वजनाचे बाळ जन्मण्याचे प्रमाण कमी करायला हवे. कमी वजनाचे बाळ जन्माला येण्यामध्ये स्त्रीची गर्भधारणा रहाण्यापूर्वीची प्रकृतीही कारणीभूत असते. यासाठी आपण देव असलेल्या आरोग्य

सेवांमध्ये गर्भधारणापूर्व आरोग्य सेवेचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. शिवाय आपण सध्या देत असलेल्या प्रसूतीपूर्व आरोग्य सेवांमध्येदेखील काही विशेष तपासण्या अंतर्भूत करायला हव्यात.
कमी वजनाचे बाळ जन्मण्याची काही महत्वाची कारणे अशी आहेत. 

  • मातेचे पहिल्या गर्भारपणाच्या वेळी वय १९ मेक्षा कमी
  • मातेचा गर्भारपणाच्या सुरवातीस BMI १८.५ किमी पेक्षा कमी आणि कुपोषण
  • मातेचे रक्तातील हिमोग्लोबीन कमी (मातेला रक्तक्षय)
  • मातेला तंबाखूसेवनाची सदय किंवा तंबाखूच्या पुराशी संपर्क
  • मातेला दारूचे सेवन करण्याची सवय
  • गर्भारपणी पुरेशी विश्रांती न घेणे, श्रमाची कामे करणे..
  • गरोदरपणी गर्भवतीचे वजन पुरेसे न वाढणे.
  • या शिवाय गर्भवती मातेला काही इतर आजार झाल्यास ही शक्यता आणखीच वाटते. उदाहरणार्थ गरोदरपणी मातेचा रक्तदाब वाढणे, योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे इ.

प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा:


नावनोंदणी व पहिली तपासणी:

गर्भवती स्त्रीची नावनोंदणी आणि पहिली तपासणी गर्भधारणेचे तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच १२ आठवडयाच्या आत होणे हिताचे असते. पहिल्या तपासणीमध्ये पुढील गोष्टी तपासल्या जाव्यात. 

वैद्यकिय तपासणी


  • गर्भवतीची उंची व वजन, तिचा BMI किती आहे याची नोंद करावी. 
  • रक्तदाब
  • सुजेची तपासणी (पायावर, चेहऱ्यावर हातावर सूज ) 
  • पांडुरकेपणा (Pallor) काविळ
  • स्तनांची तपासणी, स्टेथोस्कोपने छाती तपासणी


जोखमीच्या लक्षणांचा आढावा


  • पहिल्या तपासणीमध्ये १२ आठवड्यांच्या आत BMI १८.५ किलो पेक्षा कमी असल्यास  स्त्री कुपोषित असल्याचे दर्शविते.
  • उंची १४५ सेमी पेक्षा कमी वजन ४० किलो पेक्षा कमी ही जोखमीची लक्षणे समजावीत. बी. एम. आय. 200 किग्रॅ पेक्षा / मी असणे म्हणजेच लठ्ठपणा
  • तंबाखू / दारु सेवन चय २० पेक्षा कमी किंवा ३५ पेक्षा अधिक असल्यास, 
  • मागील प्रसूतीनंतर दोन वर्षाच्या आत झालेली गर्भधारणा
  • श्रमाची, कष्टाची कामे करावी लागत असल्याने, पुरेशी विश्रांती मिळत नसल्यास, दुपारी विश्रांती घ्यायला प्रवृत्त करावे.
  • तंबाखू सेवन, धूम्रपान, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमुळे उद्भवणाऱ्या धुराचा अप्रत्यक्ष संपर्क, मिसरी लावणे, इ. संपूर्णपणे बंद करण्याचा सल्ला द्यावा. 


मागच्या बाळंतपणात


  • कमी वजनाच्या बाळाचा जन्म, उपजत मृत बालकांचा जन्म
  • यापूर्वी एक किंवा अनेक वेळा मुदतपूर्व प्रसूती झाली असल्यास
  • दुसन्या तिमाहीमध्ये गर्भपात झाला असल्यास
  • जन्मतःच व्यंग असलेले अर्थक जन्मले असल्यास
  • प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव
  • प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव (PPH), बारेच्या प्रसूतीस विलंब
  • अशा गुंतागुंतींची पुनरावृत्ती होण्याचा धोका अधिक असतो. तिला स्त्रीरोग तज्ञाकडे संदर्भित करावे. तज्ञ डॉक्टर काही विशेष तपासण्या आणि उपचारांविषयी सल्ला देऊन ही शक्यता कमी करू शकतात. गर्भवतीला मुदतपूर्व प्रसूती किंवा कमी वजनाचे अर्भक जन्मण्याची अधिक शक्यता दर्शविणारी लक्षणे आहेत का हे पाहून तिला योग्य सल्ला द्या.


Optometrist

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

100+ eBooks, 5000+ MCQs & Previous Gov Exam Papers included!

//disable Text Selection and Copying