जागतिक काचबिंदू सप्ताह विशेष - कालामोती किंवा काचबिंदू विषयी थोडक्यात माहिती

 काचबिंदू म्हणजे काय ?

डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात.

काचबिंदूलाच 'कालामोती' असेही म्हणतात. 

काचबिंदू सप्ताह विशेष - कालामोती किंवा काचबिंदू विषयी थोडक्यात माहिती


दुर्लक्षित मोतिबिंदू पिकल्यावर डोळ्यात ताण निर्माण होतो त्यामुळे हा मोतिबिंदू 'कालामोती'मधे परावर्तित होतो. काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे यास 'सायलेंट थीफ ऑफ व्हिजन' असेही म्हणतात. 

जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते. चाळीशी पार केलेले व्यक्तींना याचा धोका संभवतो. हा डोळ्यांच्या धोकादायक विकारांपैकी एक आहे. याचे वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, अशा विकाराचे पूर्वनिदान झाले; वेळेत व नियमित औषधोपचार केले तर दृष्टीचे रक्षण करता येते.

 काचबिंदूमुळे गेलेली दृष्टी परत मिळविता येत नाही. जेवढी दृष्टी शिल्लक असते, तेवढ्याची काळजी घेणे अत्यावश्यक असते.या रोगाची चिन्हे आणि लक्षणे इतकी सौम्य असतात की खूप काळापर्यंत निर्देशनातच येत नाहीत. सर्वात पहिली चिन्हे सहसा गौण दृष्टी नष्ट होणे हे आहे.


काचबिंदूची लक्षणे


• प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंभोवती तेजोमंडल दिसणे.

• दृष्टी नष्ट होणे.

• डोळे लाल होणे.

• अस्पष्ट दिसणे (नवजात मुलांमध्ये).

• खाजवणारे आणि वेदनादायक डोळे.

• अरुंद किंवा अस्पष्ट दृष्टी.

• मळमळ आणि उलटी.

अतिरिक्त द्रवामुळे वाढलेला डोळ्याचा दाब हे काचबिंदूचे प्रमुख कारण आहे तसेच कौटुंबिक इतिहास - कोणत्याही पालक किंवा भावंडांना असेल तर वय वाढण्यासोबतच काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते इतर वैद्यकीय परिस्थिती - जसे लघु दृष्टीक्षेप, दीर्घ दृष्टीक्षेप आणि मधुमेह यामध्ये काचबिंदूचे निदान होण्याची शक्यता जास्त असते.


काचबिंदू चे उपाय


काचबिंदूचे निदान झाले की 'फर्स्ट लाइन ऑफ ट्रीटमेंट' म्हणून सर्वप्रथम डोळ्यात विशिष्ट प्रकारचे ड्रॉप घालून डोळ्यातील ताण कमी केला जातो.शिवाय औषधोपचार नियमित करावे लागतात आणि लक्षणानुसार औषधोपचारांमध्ये बदल देखील केला जातो.

 शेवटचा उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही डॉक्टर्स देतात. 


काचबिंदू मुळे अंधत्व प्रमाण


काचबिंदू हे जगभरातील अंधत्वाचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे.जागतिक स्तरावर अंदाजित 11.2 दशलक्ष लोकांना काचबिंदू असण्याची शक्यता आहे.

यासाठी जागतिक काचबिंदू सप्ताह हा जागतिक काचबिंदू असोसिएशन आणि जागतिक काचबिंदू रुग्ण असोसिएशन यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून हा अत्यंत यशस्वीपणे राबविला जात आहे.

जागतिक काचबिंदू सप्ताह यशस्वी करण्यासाठी आणि काचबिंदूविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह एका संदेशपूर्ण संकल्पनेसह साजरा केला जातो यावर्षीची संकल्पना आहे The World Is Bright Save Your Sight: जग उज्ज्वल आहे तुमची दृष्टी वाचवा.

या उज्वल जगाला बघण्यासाठी नियमित नेत्रतपासणी करून दृष्टी वाचवण्याची जाणीवेसह जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य संदेश व उद्देश आहे.

यावर्षी 6 मार्च ते 12 मार्च या दरम्यान हा आठवडा साजरा करण्यात येत आहे यादरम्यान सर्वांनी आपल्या निकोप दृष्टीसाठी स्वतःची नेत्रतपासनी करून इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच नेत्रविभागात कार्यरत सर्वांना काचबिंदू सप्ताह साजरा करण्यासाठी  हार्दिक शुभेच्छा

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying