Horizontal Autoclave वापरण्याची पद्धत

 लो / हाय-स्पिड स्टरीलाईजर (हॉरीझॉन्टल ॲटोक्लोव्ह) वापरण्याची पद्धत

Horizontal Autoclave वापरण्याची पद्धत


 १) प्रथम पाण्याचे व्हॉल उघडून बॉईलर टँकमध्ये पाणी (डिस्टील्ड वॉटर) भरणे. पाणी ग्लास ट्युब मध्ये दाखवलेल्या लेवलपर्यंत भरणे.

२) टॉगल स्वीच चालू करा.

३) कंट्रोल व्हॉल हॅन्डल क्लोज व स्लो एक्झॉस मध्ये ठेवणे. ४) ड्रम चेंबर मध्ये ठेवा आणि दरवाजा बंद करा.

५) जॅकेट प्रेशरचा गेज बघत राहणे हायस्पीड स्टेरीलायझरवर ३० मिनिटानंतर जॅकेटचे प्रेशर ३० PSI पर्यंत येईल. तर लो स्पीड स्टरीलाईजवरवर ४० मिनिटानंतर जॅकेट प्रेशर २० PSI पर्यंत येईल. व हिटरचे कॉन्ट्रॅक्टर बंद चालू होतील.

६) जॅकेटचे प्रेशर आले की कंट्रोल व्हॉलचा हॅन्डल स्टाईलवर घेणे. हायस्पीड स्टेरीलायझरसाठी ३० मिनिटे स्टरीलायझरवर ठेवणे व लो स्पीडसाठी ४० मिनीटे स्टरीलायझरवर ठेवणे

७) नंतर कंट्रोल व्हॉल्व हॅन्डल फास्ट एक्झॉस्टवर घेणे व ५ मिनीटे फास्ट एक्झॉस्टवर ठेवणे.

८) नंतर चेंबर मधली स्टीम बाहेर निघून जाईल. आणि चेंबर प्रेशर ० पर्यंत येईल. ९) नंतर हॅन्डल व्हॅक्युमवर घेणे व १० मिनिटे ठेवणे त्यानंतर चेंबर प्रेशर चा गेज ० पासुन ४ पर्यंत खाली जाईल.

१०) कंट्रोल व्हॉल्व हॅन्डल क्लोझ व स्लो एक्झॉस्टवर घेणे व दरवाजा उघडून ड्रम बाहेर काढणे.

११) २ साईकल झाल्यानंतर पाणी पुन्हा लेवल पर्यंत भरणे.

१२) दुसऱ्या साईकलसाठी हॅन्डल लगेच स्टराईलवर घेणे.

१३) दोन सेफ्टी व्हॉल आहेत. जेव्हा प्रेशर हाय स्टरीलायझरसाठी ३० PSI तर लो स्टरीलायझरसाठी २० PSI च्या पुढे जाईल तेव्हा तेथून स्टीम बाहेर जाईल.

१४) टेम्परेचर मीटर स्टराईलवर प्रेशर आल्यानंतर हाय स्टरीलायझरसाठी 131° C तर लो स्टरीलायझरसाठी 121°C पर्यंत जाईल.

 १५) मशिन वापरून झाल्यानंतर चेंबर ओल्या फडक्याने स्वच्छ करणे. दरवाजा अर्धा तास उघडा ठेवणे. बाहेरून स्टरीलाईजर स्वच्छ करणे.

१६) दोन दिवसानंतर बॉईलर टँक मधले पाणी सोडून देणे म्हणजे बॉईलर टँक स्वच्छ होईल.


व्हर्टीकल ॲटोक्लोव्ह 1 Bin & 2 Bin वापरण्याची पद्धत

१) प्रथम पाण्याचे बॉईलर टँकमध्ये पाणी (डिस्टील्ड वॉटर) भरणे. पाणी ग्लास ट्युब मध्ये दाखवलेल्या लेवलपर्यंत

२) टॉगल स्वीच चालू करा.

३) ड्रम चेंबर मध्ये ठेवा व दरवाजा बंद करा.

४) प्रेशर गेजवर १५ PSI प्रेशर आल्यावर २० मिनिटे तसेच चालू ठेवणे.

५) नंतर चेंबर मधील स्टीम बाहेर निघून गेल्यावर व प्रेशर ० वर आल्यावर दरवाजा उघडून ड्रम बाहेर काढणे. 

६) मशिन वापरून झाल्यानंतर चेंबर ओल्या फडक्याने स्वच्छ करणे. दरवाजा अर्धा तास उघडा ठेवणे. बाहेरून स्टरीलाईजर स्वच्छ करणे.

Post a Comment

0 Comments