आळशी डोळा म्हणजे काय ? लक्षण आणि उपचार

आळशी डोळा म्हणजे काय ?

आळशी डोळा म्हणजे डोळ्यामध्ये कोणताही विकार नसताना किंवा चष्मा लावून सुद्धा डोळ्याची नजर वाढत नसल्याने त्या डोळ्याला आपण आळशी डोळा असे म्हणतो. यालाच amblyopia असेही म्हणतात.

आळशी डोळा म्हणजे काय ? लक्षण आणि उपचार



आळशी डोळ्यांमुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण या डोळ्याची नजर कमी असते, दिसायला खूप अंधूक असते.

आळशी डोळ्यावर लवकरात लवकर उपचार केल्यास चांगले परिणाम बघायला भेटतात पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास गेलेली नजर आपण परत आणू शकत नाही आणि डोळ्याला नेहमीसाठीच दिसायला अंधुक राहते.


आळशी डोळा कशामुळे होतो ?


जसे की आळशी डोळा म्हणजे डोळ्यांमध्ये कोणत्याही विकार नसताना, डोळ्यांची नजर कमी होते. आळशी डोळा होण्याची खूप सारे कारणे आहेत काही कारण आपण खालीलप्रमाणे बघूया.

1. तिरळेपणा

 लहानपणापासूनच तिरळेपणा असल्यामुळे ती व्यक्ती जो डोळा चांगला आहे त्याचाच वापर करते आणि दुसरा डोळा न वापरल्यामुळे तो नेहमीसाठी आळशी बनुन जातो आणि त्यामुळे त्या डोळ्याला दिसायला अंधुक होते.

तिरळेपणा असल्यास लवकरात लवकर नेत्रशल्यचिकित्सा अधिकारी यांना त्वरित दाखवावे जेणेकरून तिरळेपणा मुळे होणारे पुढील परिणाम टाळता येतील.

2. पापणी खाली पडलेली असणे

डोळ्याची वरची पापणी खाली पडणे याला आपण असे Ptosis म्हणतो, Ptosis मध्ये पापणी खाली पडल्यामुळे दिसायला अंधुक होते आणि त्यामध्ये व्यक्ती दुसऱ्या डोळ्याची मदत घेऊन बघत असतो. या स्थितीत डोळ्याने कमी दिसत असल्यामुळे व्यक्ती त्या डोळ्याचा वापर करत नाही आणि त्यामुळे ( Amblyopia ) आळशी डोळा होतो.

जर पापणी पडणे यावर लवकरात लवकर उपचार केला तर आळशी डोळा होण्यापासून आपण वाचू शकतो.

पापणी खाली पडणे हे लहानपणापासून सुद्धा असू शकते त्यामुळे जर लहान मुलांची पापणीखाली पडलेली असेल तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप खूप आवश्यकता आहे.

लहानपणापासूनच डोळ्याची वाढ आणि दृष्टी वाढवण्याची वय असते अशातच जर तो डोळा बंद असेल तर त्यास दृष्टीची वाढ होणारच नाही आणि त्या रुग्णाला किंवा व्यक्तीला डोळा नॉर्मल असून सुद्धा दिसायला अंधुक राहते.

3. दोन डोळ्यांमधील नंबरची तफावत

जर दोन डोळ्यांमधील नंबर तफावत जास्त असेल तर अशी व्यक्ती ज्या डोळ्यांनी स्पष्ट दिसते त्याची डोळ्याचा उपयोग करत असते आणि दुसरा डोळा कमी वापरात असतो त्यामुळे कमी वापरात असलेल्या डोळ्याला (Amlyopia) आळशी डोळा होण्याची शक्यता जास्त असते. 

काहीवेळा काही व्यक्ती चष्मा असून सुद्धा चष्मा लावत नाही अशा व्यक्तीमध्ये ही आळशी डोळा होण्याचे प्रमाण वाढते.

4. जन्मतः मोतीबिंदू असणे

जर लहान मुलांना जन्मापासूनच मोतीबिंदू असेल तर तेथे आळशी डोळा होण्याची शक्यता असते त्यामुळे लहानपणीच नेत्र तपासणी करणे खूप गरजेचे आहे.

जर लहानपणीच असलेल्या मोतीबिंदूची उपचार केले तर डोळ्या आळशी होण्यापासून वाचू शकतो.

लहानपणीच मोतीबिंदू असलेल्यांना आळशी गोळा होणे चे प्रमाण अधिक आहे. 


आळशी डोळ्या वरती उपचार


लहानपणीच वेळोवेळी नेत्र तपासणी केल्याने लवकरात लवकर आळशी डोळ्याची निदान होते. 

जर लवकर निदान झाले तर आळशी डोळ्याच्या उपचारांमध्ये चांगले परिणाम बघायला भेटतात, त्याची नजर चांगली वाढते.

आळशी डोळ्यांमध्ये महत्त्वाचा उपचार म्हणजे नॉर्मल डोळा बंद करणे आपण याला Patching करणे असे म्हणतात.
यामध्ये जर लवकर उपचार चालू केले तर खूप साऱ्या रुग्णाला चांगले नजर परत येते. 

ज्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर आहे त्यांनी चष्म्याचा नंबर नेहमी वापरणे जेणेकरून आळशी डोळा ची नजर गेली परत येऊ शकते.

चष्म्याचा नंबर मधील दोन डोळ्या मधील तफावत खूप जास्त असेल तर त्यांनी नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा ते तुम्हाला चष्म्याचा नंबर मधील तफावती बद्दल अधिक माहिती देतील.


आळशी डोळ्याच्या उपचारांमध्ये महत्त्वाचे म्हणजे आळशी डोळा कशामुळे होतो आहे त्याची कारणे जर लक्षात आली तर त्यामध्ये खूप चांगले परिणाम भेटतात. यामध्ये जसे की लहानपणापासूनच मोतीबिंदू असणे, डोळ्याचा तिरळेपणा असणे, डोळ्याच्या नंबर मध्ये तफावत असणे, डोळ्यावरती फुल पडणे, चष्मा असून सुद्धा चष्मा न लावणे, पापणी खाली पडलेली असणे आणि इतर खूप सारे कारण असू शकतात.

Post a Comment

0 Comments